कोविडकाळात शहरी आणि ग्रामीण वंचित समाज घटकांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
टीम परिवर्तन ही सामाजिक संस्थेने उद्धभवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटकाळात देखील सातत्याने शहरी आणि ग्रामीण भागातील गरजु आणि वंचित समाजातील घटकाला व कुटूंबाना वेळोवेळी अन्नधान्य त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू कपडे, मास्क, सॅनिटायझ यांचे वाटप करत आहे. संस्थेला मान सन्मान प्रतिष्ठाण, स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान, शिवतेज प्रतिष्ठान कोतापूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या एकत्रित संयुक्त विद्यमाने सामाजिक संस्थांची मोलाची साथ मिळाल्याने हा उपक्रम अधिक नागरिकांपर्यंत पोहचत आहे .
मागील आठवड्याभरात जवळपास १९३ कुटूंबाना अन्नधान्य रेशन किटचे वाटप संस्थेच्या माध्यमाने केले गेले असून पोलिस सेवेतील फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिसांना स्टीमर, सॅनिटायझ आणि मास्कचे वाटप संस्था करत आहे. लहान मुलांना बिस्कीट, आरोग्य किट त्याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना शिजवलेले पदार्थ व फूड पॅकेट संस्था त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी करत आहेत.
प्रसंगी या वाटप उपक्रमात पंकज वैद्य, भावेश पै ठणे, मालोजी बोडके, करीयप्पा चलवादी हे युवक कामांचे नियोजन करत आहेत. टीम परिवर्तन या संस्थेचे सदस्य मुंबईत विविध शहरांत वंचित घटकांसाठी काम करत आहेत त्यांच्या या कामांत अनेक लोकांनी आपले योगदान दिले आहे यापुढे आम्हीं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मदत पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे संस्थेचे तुषार वारंग यांनी यावेळीं कळवले. नागरिकांनी आपल्या परिसरात असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वंचित लोकांना आपल्या पध्दतीने मदत करण्याचे त्याचबरोबर शासनाच्या नियम अटी पाळण्याचे आवाहनही त्यांनी यावेळीं केले. ग्रामीण भागात लोकांना आरोग्यविषयक साहित्य मिळावे यांसाठी संस्था प्रयत्न करणार आहे असेही यावेळीं सांगण्यात आले.








Be First to Comment