Press "Enter" to skip to content

हरेश सानप व सागर दहिंबेकर यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार जाहिर

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील संभे गावचे सुपुत्र हरेश विठोबा सानप व सागर विलास दहिंबेकर यांच्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना मानाचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार जाहिर झाला आहे.

डायनँमिक स्काँड पनवेल या नामवंत संस्थेतर्फे त्यांना सदरचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.युवा सामाजिक कार्यकर्ते हरेश सानप व सागर दहिंबेकर मागील काही वर्षापासून समाजात सक्रीय कार्यकर्ते म्हणून वावरत आहेत.तर हरेश सानप हा स्क्युबा रिव्हर राफ्टिंग प्रशिक्षक तसेच कोलाड कबड्डी असो.अध्यक्ष व अल्लराँ उंदर खेळाडू म्हणून नावलौकीक प्राप्त केलेला उद्योन्मुख खेळाडू आहे.त्याचप्रमाणे पूर,वादळ व अन्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत अनेक संकटात मदतीला धाऊन येणारा कार्यकर्ता म्हणून सर्वत्र परिचित आहे.

हरेश सानप

तर सागर दहिंबेकर हा सर्पमित्र म्हणून नावारुपाला आला असून त्याने आतापर्यंत अनेक अत्यंत विषारी साप पकडून त्यांना जीवदान दिले आहे. तसेच सामाजिक क्षेत्रातही त्याचे योगदान मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या या उज्ज्वल कामगिरीची दखल घेऊन डायनँमिक स्काँड पनवेल या नामवंत संस्थेतर्फे लवकरच एका शानदार कार्यक्रमात त्यांना गोरविण्यात येणार आहे.

हरेश सानप व सागर दहिंबेकर हे दोघेही वीर हनुमान मित्र मंडळाचे सदस्य असून मंडळाचे सर्वच उपक्रमात नेहमीच सक्रिय असतात..तर वीर हनुमान क्रीडा मंडळाकडूनही तरूणांनी विधायक कार्याकडे दक्ष देऊन सामाजिक बांधिलकी जपावी या उद्देशाने विविधांगी उपक्रम राबविले जात असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष मंगेश सानप यांनी दिली आहे. तर हरेश व सागर यांना जाहिर झालेल्या पुरस्काराने गावाचेही नावलौकीकात भर पडली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या सुयशाबद्दल वीर हनुमान क्रीडा मंडळ,संभे ग्रामस्थ व महिला मंडळ संभे तसेच कोलाड विभाग कबड्डी असो.व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडून अभिनंदन व्यक्त केले जाऊन शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.