सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।
विजेच्या लपंडावाने हैराण खालापूर नागरिकानी महावितरण अधिका-याना तहसीलदारांसमोर ऊभे करत कारभार सुधारण्याची मागणी केली.खालापूर शहरात अनेक महिन्यापासून वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुरू आहे.त्यातच चक्रिवादळानंतर कमी दाबाने विद्युत पुरवठा सुरू असून दिवसभरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. महावितरण कार्यालय देखील खालापूरातून सबस्टेशन सावरोली येथे स्थलांतरित केल्याने महावितरण अभियंता आणि कर्मचा-याकडे तक्रार नोंदविणे अवघड झाले होते.मोबाईलवर देखील संपर्क होत नसल्याने खालापूरातून संताप व्यक्त होत होता.या संतापाची दखल तहसीलदार इरेश चप्पलवार यानी घेत महावितरण आणि खालापूर नागरिकांची बैठक आयोजित केली.
नागरिकांच्या तक्रारिंवर महावितरण अधिकारी व्हि गायकवाड यानी लवकरच तांञिक अडचणी दूर करू असे आश्वासन दिले .कर्मचारी कमतरता असल्याने कामाचा अतिरिक्त ताण येत असल्याचे महावितरण अधिका-यानी कबूल केले.या बैठकिसाठी खालापूरच्या माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र शहा,महेश राठी, माजी नगरसेवक संतोष जंगम,ऊमेश गावंड,खालापूरातील सामाजिक कार्यकर्ते राजेश पारठे,आकेश जोशी, दत्ता चाळके,अनिल शिंदे,पुरषोत्तम वाणी, ऋषी चाळके,महावितरण ऊपमुख्य कार्यकारी अभियंता व्हि व्हि गायकवाड,अभियंता सचिन धनुधर्मी उपस्थित होते.










Be First to Comment