रोहा तालुक्यातील युवा शेतकरी राकेश जाधव यांची एक हजार पेरूची वृक्ष तौक्ते चक्रवादळात जमीनदोस्त, शेतकरी आर्थिक संकटात
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
कोकणात झालेल्या तौक्ते चक्रीवादलात कोकणसह रायगड जिल्ह्यात घरांचे अनेकांचे नुकसान होत भात शेती व फळझाडांचे मोठे नुकसान झाले असल्याने येथील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे मागील वर्षात ३ जूनला भयानक झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा तड्याख्यातून शेतकरी सावरतो ना सावरतो तीच परिस्थिती पुन्हा उद्धभवल्याने पुन्हा बळीराजाची धास्ती वाढली त्यामुळे शेकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली असल्याने चिंता वाढली असल्याचे दिसून येत आहे .
भाजी पाल्याच्या व्यवसायात रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या रोहा तालुक्यातील बाहे गावातील युवा होतकरू प्रगतशील शेतकरी राकेश रमेश जाधव यांनी भात शेती लागवड त्याच बरोबर भाजी पाला लागवड करत उर्वरित एक एकाराच्या आपल्या वडिलापार्जित असलेल्या शेतात एक नवा शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून फळबाग म्हणून मे २०२० मध्ये झारखंड येथून जवळपास एक ते दीड लाख रुपये खर्च करून एक हजार पेरू फळाची वृक्ष आणून आपल्या शेतात फळ लागवड केली गेली वर्षभर त्या झाडांची चांगली देखभाल करत जोपासना केली आजच्या घडीला सदरील झाडांवर फुले लागली असता केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल ही अपेक्षा आता या युवकाला लागली आणि अधिक मेहनत करत त्यांना माती भर शेणखत पानी घालणे यावर अधिक भर दिले परंतु दोन दिसांपूर्वी भयानक झालेल्या तौक्ते चक्रीवादळ व मुसळधार झालेल्या पावसात ही फळझाडे जमीनदोस्त झाल्याने युवा शेतकरी राकेश जाधव सह या गावातील अधिक नुकसानग्रस्त शेतकरी अधिक चिंताजनक असल्याचे संकेत मिळत असून नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत तरी याबाबत संबधित अधिकारी वर्गाने याबाबत पाहणी करून लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी केली जात
आहे .

वातावरण बदलवाचा जास्त फटका मिळतो तो समुद्र किनारपट्टीतील भागाला कोकणाला त्या मानाने शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देयाला हवी,, वर्षभरात दोन मोठ्या वादळाचे संघर्ष त्यात कोरोनाचा संकट ला सामना सर्वांना करावे लागले आहे .
लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा :- मनोज थिटे पोलीस पाटील बाहे
भाजी पाल्यासाठी रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या माझ्या बाहे ता.रोहा या गावातील काही शेतकऱ्यांचे या वादळात सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले..
गावातील तरुण शेतकरी राकेश जाधव यांनी मे २०२० मध्ये झारखंड वरून मागवल्या एक हजार पेरूच्या झाडाची लागवड केली होती. खूप मेहनत घेऊन सगळी झाडे जगवली मात्र तौक्ते चक्री वादळाने खूप मोठे नुकसान केले निम्म्याहून अधिक जास्त झाडे कोलमडली..तसेच जगदीश थिटे या शेतकर्याची सुद्धा दोन वर्षांपूर्वी लागवड केलेली नारळेची झाडे कोलमडून गेलीत…
अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या झाडांचे कमी जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे..
त्यात भाजी व्यवसायातील मिर्ची वांगी टॉमेटो आशा भाजी पाल्याचे देखील खूप नुकसान झाले आहे तरी संबंधित कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांना माहिती पुरविली आहे…
गेल्या वर्षी चक्रीवादळात झालेली नुकसानभरपाई मिळविण्यासाठी आमचे युवा आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या अथक प्रयत्नातून येथील शेतकरी वर्गाला अधिक लवकरात लवकर मदत उपलब्ध झाली .. त्यांच्या सहकार्य मुळेच गावातील प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळाली होती यावेळी देखील संबधित कृषिधिकारी उबाळे मॅडम यांनी पाहणी करत पंचनामे सुरू असून येथील नुकसानग्रस्त व चिंताग्रस्त शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत.








Be First to Comment