सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
तालुक्यातील बहुतेक शेतकरी शेती करीत असतात मात्र पावसाचे आगमन झाल्यास शेतीसाठी लागणारे खते, बियाणे,औजारे अदि वस्तूची खरेदी शेतकरी वर्ग करीत असतात.मात्र काही वेळा दुकानदार वाजवी पेक्षा जास्त किंमत घेतो,किंवा दिनांक निघून गेलेला माल विक्री केला जातो.त्याच बरोबर छापील किंमत न घेता शेतकरी वर्गांची फसवणूक केली जात असते.मात्र तसे होवू नये यासाठी शेतक-यांस तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी आवाहन केले आहे.की असे कोणतेही दुकानदार शेतकरी वर्गांची फसवणूक करीत असल्यास तक्रार केल्यास त्या दुकानदार वर कारवाई केली जाईल.
शेती हा आपल्या अर्थशास्त्राचा कणा आहे.मात्र गेल्या काही वर्षामध्ये कारखानदारी वाढली असून,त्याचबरोबर नियोजित वेळेवर पावसाचे आगमन न होणे,ओळा दुष्काळ अतिवृष्टी अदि सर्व कारणांमुळे शेतकरी वर्गांस मोठ्या नुकसान होत असते.यामुळे शेती कमी होत चालली आहे.मात्र गेल्या काही वर्षात शेतीचे महत्व तरुण वर्गांस समजले असून तरुण वर्ग शेतीकडे वळले आहे.शेतीमधून विविध पिके घेत आहे.या पासून नफा ही मोठ्याप्रमाणावर मिळत असतो.शेतीतून जास्तीतजास्त नफा मिळावा.या उद्देशाने तालुक्याच्या ठिकाणी असलेले दुकानांतून शेतीसाठी लागणारे औषधे खरेदी केली जात असतात.मात्र काही औषधांची मुळ किंमत माहित नसल्यामुळे शेतकरी वर्गांची मोठी फसवणूक होत असते.
शेतकरी वर्गांवर अन्याय होता कामा नये.शिवाय शेतकरी जगला पाहिजे.
शेतीसाठी लागणारे बियाणे,खते,औजारे छापील किंमतीत मिळावी. त्याचबरोबर दिनांक ही त्याच्यावर स्पष्ट पणे लिहली असावी.घेतलेल्या मालाची पक्के बील मिळाले पाहिजे त्याच बरोबर सोशल डिस्टंट चे पालन केले पाहिजे.शेतकरी वर्गांस सहकार्य करावे.असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ यांनी केल आहे.







Be First to Comment