सिटी बेल लाइव्ह / खालापूर #
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुलाबा जिल्हा महामार्ग प्रमुख रोहित कुलकर्णी व तबला वादक राकेश कुलकर्णी यांचे वडील व संघस्वयंसेवक गजानन रामचंद्र कुलकर्णी (७०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले.
मस्को कंपनीतून निवृत्त झालेले गजानन कुलकर्णी अतिशय धार्मिक वृत्तीचे होते. हनुमान प्रसादिक भजनी मंडळाचे ते तीस वर्ष सदस्य होते. त्यांच्या निधनाने एक चांगले व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले आहे अशा शब्दात संघाचे तालुका संघचालक राकेश पाठक व तालुका कार्यवाह अविनाश मोरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.






Be First to Comment