Press "Enter" to skip to content

तौत्के चक्रीवादळामुळे केळ्यांची बागाचे नुकसान शेतकरी चिंताग्रस्त

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

ताउत्के चक्री वादळात होण्याची सुचना हवामान खात्यांन दिली असल्यामुळे ती खरी ठरली यामुळे अनेक ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला होता.शिवाय बाजार पेठ ही लवकरच बंद करण्यात आली होती.या चक्रीवादळाची तीव्रता खूप असल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले.

आंबा पेरु,जांभूळ,काजू अदि झाडे मुळासकट उपटलेली पहावयास मिळाली.त्याच बरोबर रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे सुद्धा या चक्रीवादळात पडल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता.

तालुक्यातील शेतकरी वर्ग शेती समवेत फळ बागाचे उत्पन्न ही घेत असतात या माध्यमातून त्यांस सातत्याने रोजगार ही मिळत असतो.खालापूर तालुक्यातील तांबाटी गावातील असलेले शेतकरी संतोष रमाकांत दळवी यांनी आपल्या जवळ असलेल्या दिड एकर शेतामध्ये १६६० केळ्यांची लागवड केली.मात्र चक्रीवादळा मुळे शेकडोहून अधिक या केळ्याचे झाडाचे मोठे नुकसान झाल्यांचे चित्र समोर आले आहे.

तालुक्यातील असंख्य शेतकरी वर्गांचे या चक्रीवादळामुळे बागायतीदारांचे नुकसान झाल्यांचे निदर्शनास येत आहे. कोरानो सारखे संकट अजूनही मोठ्या प्रमाणात डोके वर काढत असतांना आता नविन संकट निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गासह अनेकांच्या मनामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी आपल्या शेतात घाम घाळूनी सातत्याने आपल्या काळ्यामातीतून काही विविध प्रयोग करीत असतो. मात्र निसर्गाची साथ वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडत चालले आहेत.दळवी यांनी आपल्या शेतात. आळे ,ॲपल बोर,शेवगा, तसेच मच्छी तलाव असे विविध प्रयोग आपल्या शेतात करीत आहेत.मात्र चक्री वादळ निर्माण झाल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले असून सदर झालेल्या नुकसानींचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गांतून व्यक्त केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.