सलग तीन वर्षे होत आहे नुकसान
सिटी बेल । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
दोनच दिवसांपूर्वी होऊन गेलेल्या चक्रीवादळाने व लागोपाठ कोसळलेल्या अवकळी पावसामुळे उन्हाळी भातशेतीला चांगलाच तडाखा बसला असून तयार भातशेती जमिनदोस्त झाली आहेच याशिवाय कापलेल्या भाताची करपेही पाण्यावर तरंगल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
डोलवहाल बंधा-याच्या पाण्यावर आधारित काढलेल्या कालव्याद्वारे रोहे तालुक्यात उन्हाळी हंगामात भातशेतीचे पिक काढले जात आहे.उन्हाळी भातशेतीमुळे शेतकरी वर्गाला चांगला दिलासा मिळून ब-यापैकी आर्थिक सुबत्ताही आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील भातशेती पिकविणे शेतकरी वर्गाच्या द्रुष्टीने फायदेशीर ठरू लागली आहे.
कालव्याच्या पाण्यावर आधारित भातशेती पिकविणे फायदेशीर ठरू लागल्याने शेतकरी वर्गाचा कलही उन्हाळी भातशेती पिकविण्यावर दिसून येत आहे. परंतू शेती व शेतकरी वर्गावर अधून मधून येणाऱ्या संकटांचा विचार करता काहीवेळा उन्हाळी भातशेती पिकविणे म्हणजे मोठेच कष्टाचे होऊन जाते.तर दोनच दिवसांपूर् आलेल्या चक्रीवादळाने तुफान कोसळलेल्या अवकळी पावसाने कापणीलायक झालेली भाताची कणसे जमिनदोस्त झाल्याने व काही ठिकाणी कापलेली
करपे शेतात जास्त पाणी झाल्याने पाण्यावर तरंगल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आहे.
दिवसेंदिवस शेतमालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही, महागाईने कंबरडेच मोडले आहे. शेती नाही पिकविली तर खाणार काय ? कारण बहुतांश शेतकरी कुटुंब ही शेतीवरच आपले उदरनिर्वाह करीत आहेत. अशावेळी भातशेतीचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरीवर्ग उसनवारी करून किंवा कर्ज काढून भातशेती पिकवितो आहे. परंतू निसर्गच जर साथ देत नसेल तर काय करावे ?असा यक्षप्रश्नही शेतकरीवर्गाला पडला आहे.सलग तीन वर्ष अवकाळी पाऊस शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे.तर नुकत्याच झालेल्या नुकसानीचे शासनातर्फे लवकरात लवकर नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करून शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.








Be First to Comment