Press "Enter" to skip to content

वादळामुळे गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर, तातडीने पंचनामे करण्याची मागणी

तौक्ते चक्रवादळ व तुफान पाऊस यामुळे कोलाड परिसरातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे प्रचंड नुकसान

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।

रोहा तालुक्यातील कोलाड-खांब परिसरातील शेतकऱ्यांचे तौक्ते चक्रीवादळ व तुफान पडलेल्या पावसामुळे कापून ठेवलेल्या भातशेतीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन गु्रांच्या चाऱ्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी बळीराजा कडून केली जाते.

कोलाड-खांब परिसरातील कोलाड, महादेववाडी, हेटवणे,चिंचवली, तिसे, पुई,गोवे,मूठवली, शिरवली, पुगांव,खांब, नडवली व या परिसरातील इतर काळव्याच्या पाण्यावर पिकवली जाणारी भातशेतीचे तौक्ते चक्रीवादळ व प्रचंड तुफान पडलेल्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान झाले आहे.या परिसरातील भातशेती ही कोलाड पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत सोडण्यात येणाऱ्या कालव्याच्या पाण्यावर भातशेती केली जाते.

या पाण्यावर केली जाणारी भातपिके उत्तम प्रकारे आली.व पावासाला सुरु होण्यास पंधरा ते वीस दिवस शिल्लक असल्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांनीभातशेतीची कापणी,बांधणी केली केली परंतु अवकाळी आलेल्या तौक्ते चक्रीवादळ व तुफान पाऊस यामुळे कापून बांधून ठेवलेल्या भातपिकात पाणीच पाणी होऊन भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.याबरोबर पावसाला हंगामात चार महिने पुरणारा गु्रांचा चारा पेंडा हे ही भिजल्यामुळे गु्रांच्या चाऱ्याचा प्रश्न ही गंभीर बनला आहे.

पाटबंधारे विभागाला या अगोदरच काळव्याचे पाणी बंद करण्यासाठी सांगितले होते.परंतु त्यांनी पाच ते सहा दिवस पाणी बंद करण्यासाठी जास्त दिवस लावल्यामुळे शेतातील पाणी निघण्यास वेळ गेला नंतर भात कापणी केली ती तौक्ते चक्रीवादळ व तुफान पावसामुळे शेतात प्रचंड पाणी साठून भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती वाळंज यांनी केली आहे.

अगोदर बीबीयाणे, खते यांची भाव वाढ यामुळे शेतकरी वर्गाला जास्त किमंत मोजावी लागली तरी सर्व परिस्थितीवर मात करीत शेतकरी वर्गाने भातशेती केली व भात पीक ही उत्तम प्रकारे आले परंतु दोन दिवस पडणारा तुफान पाऊस यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असल्यामुळे बळीराजा हताश झाला आहे.त्यामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे त्वरित पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.