Press "Enter" to skip to content

तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी : ॲड. रंजना धुळे

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई पावसाळ्यापूर्वी मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला कॉग्रेस तालुकाध्यक्षा अध्यक्षा ॲड. रंजना धुळे यांनी एका पत्राव्दारे केली आहे.

तौत्के चक्रीवादळाने थैमान घातले असून कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. लोकांच्या घराची गोठयांची छपरे उडाली आहेत. काही ठिकाणी घराच्या भिंती सुद्धा कोसळल्या आहेत, सध्या कोरोना संकटात सर्वसामान्य होरपळून निघाला आहे, रोजगार काम धंदा व्यवसाय नाही. त्यात घरातील आबाल वृद्धांचे आजारपण त्याने सर्वसामान्य कर्जात बुडाला आहे त्यामध्ये वादळाने घरादाराचे, शेतीचे नुकसान झाले आहे तोंडाशी आलेला घास गेला याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना मदतीचा हात देणे जरुरीचे आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यामार्फत शासनाकडे केली आहे, त्वरित पंचनामे करून पावसाळ्यापूर्वी नुकसान भरपाई मिळावी जेणे करून वादळात मोडलेले घर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक पुन्हा पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करेल.मागणी चे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना मेलद्वारे पाठविण्यात आल्याचे ॲड. रंजना धुळे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.