Press "Enter" to skip to content

तौक्ते चक्रिवादळाने रसायनीतील जनजीवन विस्कळित

विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून तारेवरची कसरत

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

तौक्ते चक्रिवादलाचा रसायनी पाताळगंगा परिसरात जोरदार प्रभाव दिसून आला.दि.१७ मेच्या मध्यरात्रीपासूनच सायंकाळपर्यंत वा-यासह मुसळधार पाऊस सुरू होता.चक्रिवादळामुळे मोहोपाडा-रसायनी रस्त्यावरील काही झाडे उन्मळून पडली.तर ठिकठिकाणी विजपोल,विजवाहिन्या गलून पडल्या होत्या.परंतु विजवितरण मोहोपाडा कार्यालयाच्या नियोजनबद्ध कामामुळे दिवसा बत्ती गुल होती मात्र रात्री पुर्ववत सुरू झाली.

रसायनी पोस्ट कार्यालयासमोर रस्त्यालगतची भलीमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने काहीवेळ वाहतुकीचा खोलंबा झाला होता.तसेच परिसरात चांभार्लीं, रिस,मोहोपाडा, तळेगाववाडी आदी परीसरात मोठमोठे वृक्ष विजवाहिन्यांवर कोसळल्याने विजवितरणासमोर आव्हान होते.चक्रिवादळामुले परिसरात विजपोल आठ,एलटी पोल नऊ कोसळले तसेच परिसरातील बारा पोल वाकल्याने सोमवारी पुर्ण दिवस विजपुरवठा खंडीत झाला होता. तो रात्री आठ नंतर एमआयडीसी ,मोहोपाडा नंतर रिस असा टप्याटप्याने सुरु करण्यात आला.

मोहोपाडा विजमंडलाचे उपअभियंता किशोर पाटील,किर्दंकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली तौक्ते चक्रिवादलाच्या पाश्र्वभूमीवर याअगोदरच विजमंडळाकडून नियोजन करण्यात आले होते.या नियोजनबद्ध कामाने मोहोपाडा परीसरात फक्त दिवसा बत्ती गुल होती रात्री आठ वाजेपर्यंत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेली परिस्थिती लक्षात घेत वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांनी तारेवरची कसरत करीत वीजपुरवठा रात्री पुर्ववत सुरू केला. या विजमंडलाच्या कामांचे परिसरात कौतुक होत आहे.

सोमवारी पहाटेपासूनच तौक्ते चक्रिवादल वारे वाहू लागल्याने पावसानेही चांगलीच बरसात केली.तौक्ते चक्रिवादलामुले रसायनीत सोसाट्याच्या वा-याने तळेगाव आदीवासीवाडीतील दत्तात्रेय लक्ष्मण पवार यांच्या घराची भिंत कोसळून पत्र्याची शेड वा-याच्या प्रवाहावर उडाली.तर याच वाडीतील गोरक्षनाथ चंदर पवार व ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार यांच्या घरावरील छप्पर उडाले.वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रसायनी परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी तुरळक घरावरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.