Press "Enter" to skip to content

हितेनसेठ यांच्या कडून माथेरानच्या हातरिक्षा चालकांना मदतीचा हातभार

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।

गेल्यावर्षीच्या लॉक डाऊन काळात फक्त घोडेवाल्यांना घोड्यांसाठी अश्वचारा मोठया प्रमाणावर वाटप करण्यात आला होता आणि आताही मोठया प्रमाणावर चार महिने पुरेल इतका अश्वचारा विविध दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून वाटप करण्यात आला आहे.

माथेरान मध्ये घोडा आणि हातरीक्षा हीच
मुख्य प्रवासी वाहने असून लॉक डाऊनच्या कठीण काळात हातरीक्षा ओढणाऱ्या श्रमिकांच्या उदरनिर्वाह बाबतीत कुणीही गांभीर्याने घेतले नव्हते.
त्यामुळे ही बाब संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी मुंबईच्या धुती फाउंडेशनचे सर्वेसर्वा हितेनभाई सेठ यांच्या निदर्शनास आणून दिली त्यांनुसार हितेनसेठ यांनी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात उत्तम प्रतीचे किट ज्यामध्ये तेल, तूप, तूरडाळ, चना डाळ, लक्स साबण, मैदा, रवा, साखर, सर्वप्रकारचे मसाले, बासमती तांदूळ, गव्हाचे पीठ, अशा स्वरूपाचे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य लोकांना जगणे कठीण झाले आहे यात माथेरान करांचे जीवन पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे . संपूर्ण वर्षभरात अवघा तीन महिन्यांचा व्यवसाय स्थानिकांना मिळाला. हात रिक्षा चालक माथेरानचे खरे समाजसेवक आहेत. इथे वाहनांना बंदी असल्याने वयोवृद्ध नागरिक जेष्ठ महिलांना माथेरान मध्ये फिरण्यासाठी व रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेवुन जाण्याचे महत्त्वाचे काम हे रिक्षा चालक करीत असतात

कोरोनाच्या महामारीचा सर्वात मोठा फटका रिक्षा चालकांना बसला आहे.
करुणा प्राणी संघटनेचे अध्यक्ष अरविंदभाई शाह अश्वपालकांना भुसा वाटपा साठी आले असता श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनिल शिंदे यांनी रिक्षा चालकांना मदती साठी विनंती केली होती . गेल्या लॉक डाऊन मध्ये देखील रिक्षा चालकांना मदत केली नव्हती ह्या वर्षी सर्वांचीच आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे अश्या परिस्थिती धृती फाऊंडेशन तर्फे झालेली मदत महत्वपूर्ण असल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल व वर्षा शिंदे यांनी व्यक्त केले . रिक्षा चालकांना जो मदतीचा हात पुढे केला आहे त्यामुळे आपण सर्वजण देवदूत असल्याची भावना उपाध्यक्ष प्रकाश सुतार यांनी व्यक्त केली. या वाटप कार्यक्रमात अरविंदभाई शाह यांची प्रमुख भूमिका होती.

हितेन सेठ यांनी दिलेले किट उत्तम दर्जाचे असल्याचे रिक्षा चालक रुपेश गायकवाड, दीपक रांजाणे, चंद्रकांत चावरे,गणपत रांजणे यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.