समाजातील गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचे केले वाटप
सिटी बेल । मुंबई । विश्वास निकम ।
टीम परिवर्तन ही सामाजिक संस्था कोरोनाच्या संकटकाळात सातत्याने गरजु आणि वंचित नागरिकांना वेळोवेळी अन्नधान्य त्याचबरोबर कपडे, मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करत आहे. संस्थेने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या मदतीने मागील आठवड्याभरात ३०० हुन अधिक कुटूंबियांना अन्नधान्यातील रेशन किटचे वाटप केले .
मुबंई शहरातील विविध ठिकाणी पोलिस स्टेशन मधील फ्रंट लाईनवर काम करणाऱ्या पोलिस बांधवांना स्टीमर, सॅनिटायझ आणि मास्कचे वाटप संस्था सातत्याने करत आहे. तसेच काही ठिकाणी लहान मुलांना बिस्कीट, टँग त्याचबरोबर रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना शिजवलेले फूड पॅकेट संस्था पुरवठा करत असून पदाधिकारी वाटप करत आहेत.

या वाटप उपक्रमात पंकज वैद्य, भावेश पैठणे, मालोजी बोडके, संजय जांगळी, गौरव जाधव, करीयप्पा चलवादी हे युवक कामांचे नियोजन करत आहेत. टीम परिवर्तन या संस्थेचे सदस्य मुंबईत विविध शहरांत वंचित घटकांसाठी काम करत आहेत त्यांच्या या कामांत अनेक लोकांनी आपले योगदान दिले आहे यापुढे आम्हीं अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मदत पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती संस्थेचे तुषार वारंग यांनी यावेळीं दिली आहे .
नागरिकांनी आपल्या परिसरात असलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वंचित लोकांना आपल्या पध्दतीने मदत करण्याचे त्याचबरोबर शासनाच्या नियम अटी पाळण्याचे कोरोना संसर्ग रोखण्याकरिता आवाहनही ते टीम परिवर्तन आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करत आहेत .








Be First to Comment