भात कापणीच्या कामात पावसाचे सावट, बळीराजाच्या चिंतेत वाढ
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील भात पीक अंतिम टप्यात आले असून या विभागातील भातशेती कापण्यासाठी सुरुवात झाली असुन याच दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी तुरलक प्रमाणात पासुन पडत भात शेती कापण्यासाठी पडत असल्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढलेली दिसत आहे.
रोहा तालुक्यातील उन्हाळी हंगातील शेती ही कोलाड पाटबंधारे विभाग यांच्या मार्फत डोळवहाल धरणामधून कळव्या मार्फत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा आधारे डिसेंबर ते मे महिन्या अखेर केली जात असुन या साठी शेतकरी वर्गाला अतिशय कठोर मेहनत घ्यावी लागते.या वर्षीही भात पीक चांगले आहे असुन भात कापणीला सुरवात करण्यात आली परंतु १४ मे ते १६ मे पर्यंत कोकणात चक्री वादळाचा अंदाज दिला असुन महाड परिसरात काळ १४ मे रोजी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला असुन असाच पाऊस पडला तर हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या वर्षीही रोहा तालुक्यात भाताचे पीक उत्तम प्रकारे येऊन तुफान पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या वर्षी ही भात पीक चांगले आले असुन ते कापणी,बांधणी, झोडणी साठी जोरदार सुरवात झाली आहे परंतु अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आजून दहा ते पंधरा दिवस पाऊस लांबला तरच सर्व पीक कापून, बांधून, झोडून सुखरूप पुर्ण होईल असे शेताकरी वर्गातून बोलले जात आहे.








Be First to Comment