शोध
सतत शोध घेते मी
माझ्यातल्या स्वतःचाही
कधी भेटेलका मी
माझ्यातल्या मलाचही
मुलांच्या रुपात दिसते
मला प्रतिबिंब माझेच
तरीही सतत निराळी
भासते मी मलाच
कुठुनी आली आहे
मी या चराचरात
पृथ्वी वरील या
मंतरलेल्या जगात
कधी तरी वाटते
अर्थ असावा यात
माझा जन्म या
भूतलावर होण्यात
ऋणानुबंध असावे
मागील जन्मातील
पुढील जन्मात सर्व
पुन्हा मला भेटतील ?
जन्मा पासुन अंतापर्यत
माझे इथे अस्तित्व
जाणवते आहे हेच
जीवनाचे खरे तत्व
जन्म तारुण्य मृत्यु
याचा प्रवास श्वासाला
त्याची कायम जाणीव
होत असते मनाला
खुप गुढ आहे अगाध
त्या परमेश्वराची लिला
या रंगभूमिवर फक्त
एक पात्र रंगवायचे मला
नाटकाचे अंक संपल्यावर
मंचावरुन उतरावयाचे मला
म्हणुनच त्यातील पात्रात
जास्त गुंतायचे नाही मला
याची जाणीव सतत
होत असते मलाच
म्हणुनच शोध घेते मी
माझ्यातल्या स्वतःचाच
वैशाली केतकर, नवीन पनवेल
Be First to Comment