महात्मा बस्वेश्वर यांची 890 वी जयंती उत्सव व द्विपंधरवाडा कोरोना प्रादुर्भावामुळे सार्वजनिक स्वरूपात साजरा न करता घरोघरी साजरा करा
सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।
शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहरराव धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यासह ईतर राज्यातील शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे पदाधिकारी, वीरशैव लिंगायत समाजातील जगदगुरु, शिवाचार्य(धर्मगुरू )यांची दिनांक 9 मे 2021रोजी झुम अँप द्वारे ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले.यात महात्मा बसवेश्वर जयंती व द्विपंधरवडा उत्सव (30 दिवस चालणारे विविध उपक्रम, कार्यक्रम ) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करत सार्वजनिक स्वरूपात साजरी न करता घरातच साजरी करण्याचे आवाहन शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे.
वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व वीरशैव लिंगायत समाजाची सर्वात प्रभावी, आक्रमक असलेल्या लोकशाही पद्धतीने चालणारी अखिल भारतीय स्तरावरील एकमेव संघटना म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव संघटना सर्वपरिचित आहे. शिवा संघटनेकडून संबंध राज्यभर दरवर्षी साजरी होणारा क्रांतिसुर्य जगतज्योती महात्मा बस्वेश्वर यांची जयंती ऊत्सव, द्विपंधरवाडा उत्सव यंदा सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संबंध राज्यात थैमान घातलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सार्वजनिक स्वरूपात न करता घरोघरी साजरी करण्यात येणार असल्याची घोषणा शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केले आहे. महात्मा बस्वेश्वर हे वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मसंस्थापक नसून प्रचारक, प्रसारक आहेत.लोकशाहीचे ते आद्य जनक आहेत. जगातील पहिली लोकशाही संसद महात्मा बसवेश्वर यांनी “अनुभव मंडप” च्या माध्यमातून स्थापन केली. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून प्रेम बंधुता, समानता, ऐक्याची शिकवण दिली. महात्मा बसवेश्वर सर्वधर्म समभावी असल्याने सर्व जातीधर्माचे अनेक व्यक्ती त्यांचे शिष्य होते. अठरा अलुतेदार, बारा बलुतेदार त्यांचे शिष्य होते. व ते महात्मा बसवेश्वर यांच्या कार्यात समाजकार्यात नेहमी सहभागी असायचे. आजही सर्व जातीधर्माचे नागरिक बसवेश्वरांना मानतात. त्यांची पूजा अर्चा करतात. त्यांच्या विचारानुसार चालतात. अश्या थोर समाजसुधारक असलेल्या महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्सव 14 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी ठीक 10:30 वाजता आपापल्या घरीच साजरी करून शिवा संघटनेच्या ग्रुपवर व फेसबुकवर लाखोंच्या संख्येने फोटो अपलोड करावे असे आवाहन प्रा. मनोहर धोंडे यांनी तमाम वीरशैव-लिंगायत समाजबांधव,महात्मा बस्वेश्वर प्रेमींना व शिवा संघटनेच्या लाखो मावळ्यांना झुम अँप द्वारे ऑनलाईन माध्यमातून यावेळी केले.तसेच येणाऱ्या 2021 च्या जणगणणेत धर्माच्या रकान्यात “वीरशैव-लिंगायत” अशीच योग्य नोंद करावी असेही स्पष्टपणे सांगितले.
नांदेड जिल्ह्यात शिवा संघटनेचे हायटेक मुख्यालय “शिवा सृष्टी ” ची निर्मिती करण्यासाठी आजपर्यंत 51 आजिवन सदस्यांची नोंदणी झालेली असुन येणाऱ्या काळात हजारोंच्या संख्येने सभासद नोंदणी करण्याच्याही सुचना प्रा. धोंडे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शिवा संघटनेच्या कुटुंब अँपवरती फक्त तीन दिवसातच 5000 सदस्यांची विक्रमी नोंद झालेल्या अँपवर जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी सदस्य नोंदणी करावी व ही संख्या लाखोंच्या संख्येत सदस्य गेले पाहीजे असे टार्गेट देऊन जलदगतीने काम करण्याचे कार्य सर्व कार्यकर्त्यांना ऑनलाईनच करण्याच्याही सुचना प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी यावेळी दिल्या. 9 मे 2021 रोजी ऑनलाईन झूम ऍपद्वारे महत्वाच्या विषयावर ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले.या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून सखोल मार्गदर्शन जुम अँप लाईव्ह माध्यमातून यावेळी प्रा.धोंडे यांनी शिवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केले.या मिटिंग मध्ये जनगणना 2021 मधे वीरशैव लिगांयत अशीच नोंद करण्याबाबत महाराष्ट्रातील 48 शिवाचार्य व 4 जगदगुरु यांनी शिवा संघटनेच्या भुमिकेस ऑनलाईन बैठकीत एकमतानी होकार देउन येणाऱ्या काळात सर्व महाराष्ट्रात दौरे करुन जनगणना नोंदीसाठी जनजागृती करु अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
कोवीडचा प्रादुर्भाव लक्षात घेता हे संकट महाभयंकर असुन जीव अत्यंत महत्त्वाचे असल्याने शासनाच्या कोरोना विषयक मार्गदर्शक तत्वाचे पालन करत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा मौलिक सल्ला प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी सर्वांना दिला. गेल्या काही दिवसात वीरशैव-लिंगायत समाजातील काही गुरुवर्य व शिवा संघटनेतील पदाधिकारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Be First to Comment