Press "Enter" to skip to content

उन्हाच्या झळा असह्य,मेंढ्यानी घेतला वृक्षांच्या सावलीचा आधार

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

एप्रिल महिन्या पासून उन्हाचा झळा असह्य होत असल्यामुळे, पशु,पक्षी पासून सर्वचजण हैराण झाले आहे.मे महिन्यात सुर्य देवाने उग्र रुप धारण केल्याने वातावरण असह्य होवून जात आहे.यामुळे थंडावा मिळण्यासाठी मेंढ्यांनी वृक्षांच्या सावलीचा अधार घेत आसल्याचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.

कोकणात घाटमाथ्यावरील मेंढपाल मोठ्या संख्येने येत असल्यामुळे उन्हाच्या झळा त्यांना सोसाव्या लागत आहे.या उन्हा पासून संरक्षण व्हावे,या उद्देशाने मेंढ्यांनी आंबा, वड,जाभुळ, पिंपळ आदि वृक्षांच्या सावलीचा आधार घेत आहेत.तालुक्याच्या ठीकाणी धनगर समाज मोठ्या प्रमाणात येत असून आठ महिने खडतर प्रवास करून घराबाहेर रहावे लागत असते.

यामुळे मिळेल तिथे चारा व पाण्याची व्यवस्था पाहुन मेंढपाळ आपला मुकाम त्या ठीकांनी स्थिरावत असतात.मात्र रणरणत्या उन्हामुळे मेंढय़ा चरण्यासाठी मोठी समस्या निर्माण असल्यामुळे उन्हापासुन मेंढय़ाचे संरक्षण व्हावे या विचाराने मेंढय़ा दुपारी १२ ते ४ या वेळेमध्ये एखाद्या वृक्षांच्या सावलीचा अधार घेताना दिसत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.