Press "Enter" to skip to content

रेवस धक्याकडे जाणाऱ्या २२०० मीटर लांबीच्या रस्त्याचे होणार नूतनीकरण


आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्याला यश !


सिटी बेल। अलिबाग । अमूलकुमार जैन ।

बारमाही सागरी वाहतूक करणाऱ्या अलीबाग तालुक्यातील रेवस बंदराकडे जाणाऱ्या मार्गापैकी अंदाजे २२०० मीटर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या की महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अखत्यारित येतो,ह्या संभ्रमामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्त होतच नव्हता.त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी,वाहनचालक,रिक्षा आणि मिनिडोअर व्यावसायिकांना त्याचा त्रास होत होता.नागरिकांनी विविध स्तरावर ह्याबाबत तक्रारी करूनही ह्या समस्येवर तोडगा निघालेला नव्हता.अखेर सदर रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांच्याकडे ह्याबाबत तक्रार आली.

ह्या रस्त्याचे गुणवत्तापूर्ण नूतनीकरण करण्याबाबत दिलीप भोईर यांनी आमदार जयंतभाईंच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि त्यांच्या सूचनेनुसार स्वतः लक्ष्य घातले.महाराष्ट्र सागरी मंडळाने(महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड)तात्काळ ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ह्या रस्त्याची जबाबदारी स्वीकारली आणि आता रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे.

रेवस हे बारमाही प्रवासी वाहतूक करणारे सुरक्षित बंदर आहे.मात्र, शासन त्याकडे दुर्लक्ष करत आलेले आहे.ह्या रस्त्याने प्रवास करणारे नागरिक, वाहनचालक आणि वाहनमालकांची समस्या संबंधित विभागापर्यंत पोहोचणे गरजेचे होते.त्यामुळे मार्गदर्शक नेते आमदार जयंत पाटील ह्यांच्या मार्गदर्शनानुसार लोकप्रतिनिधी म्हणून दिलीप भोईर यांनी कर्तव्य पार पाडले आहे.प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी ओळखून वागले तर नागरिकांना संघर्षाची भूमिका घ्यावीच लागणार नाही.ह्या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे,म्हणून दिलीप भोईर स्वतः ह्या कामावर लक्ष्य ठेवून आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.