सिटी बेल लाइव्ह / मुरूड जंजिरा /अमूलकुमार जैन #
प्रधानमंत्री जन कल्याणकारी योजना जागरूकता अभियान अंतर्गत असणाऱ्या अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी आमीर खानजादा यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री जनकल्याणाकारी योजना जागरूकता अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष अनितकुमार कौशिक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष विरेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत सर्व सामान्य जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजेत त्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये यासाठी प्रधानमंत्री जनकल्याणाकारी योजना जागरूकता अभियानतंर्गत सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत असणाऱ्या अल्पसंख्याक मोर्चा च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी आमीर खानजदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आमीर खानजदा यांची महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्या योजना अल्पसंख्याक समाजासाठी नव्हेच तर इतर सर्व समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे.माझ्यावर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जाजू,प्रधानमंत्री जनकल्याणाकारी योजना जागरूकता अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष अनितकुमार कौशिक यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष विरेश सावंत यांनी माझ्यावर जो विश्वास टाकून महाराष्ट्र प्रदेशाची जबाबदारी दिली आहे.त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.






Be First to Comment