Press "Enter" to skip to content

“मराठमोळं मुलुंड” संस्थेने वेबीनार द्वारे केले लघु उद्योजकांच्या यादीचे लोकार्पण

सिटी बेल लाइव्ह / मुलुंड / प्रतिनिधी :

मुलुंडमधील सुप्रसिध्द “मराठमोळं मुलुंड” संस्थेने दूरचित्र संवाद ( वेबनार ) व्यासपीठवर मुलुंडमधील लघुउद्योजकांंची सुचीचे लोकार्पण केले. सदर लोकोपयोगी लघुउद्योजकांच्या सुचीचे लोकार्पण प्रख्यात उद्योगपती शंतनुराव भडकमकर यांच्या हस्ते संस्थेच्या संकेतस्थळावर (वेबसाईटवर ) करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सल्लागार सदस्य दै नवशक्तीचे संपादक सुकृत खांडेकर, मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम, राजकिय विश्लेषक पत्रकार प्रकाश बाळ जोशी,संस्थेचे अध्यक्ष हेंमंत मोरे, कार्याध्यक्ष महेश चव्हाण मार्गदर्शक मिहीरसर तसेच बहूसंख्येने संस्थेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

याआधी सुरूवातीस कार्याध्यक्ष महेश चव्हाण यांनी सर्वांचे स्वागत केले आणि संस्थेबाबत माहीती दिली. त्यानंतर विश्वस्त पद्माताई प्रधान यांनी कार्यकारणीतील बदल आणि संस्थेच्या पुढिल वाटचालीची माहीती दिली.संस्थेचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी,लोकार्पण केलेल्या लघुउद्योजकांच्या सुचीच्या संकल्पने विषयी आणि ती प्रत्यक्षात बनविण्यासाठी ज्या सभासदांनी मेहनत घेतली त्याविषयी सविस्तर माहीती दिली. सूचीतील उद्योजक सदस्य व मराठमोळं मुलुंड संस्था किंवा संस्थेतील सभासद यांचा लिस्टमधील उद्योजकांशी थेट संबंध नाहीये, त्यांची मुलुंड मध्ये पब्लिसिटी होऊन त्यांना त्यांच्या उद्योगामध्ये भरभराट व्हावी या प्रामाणिक इच्छेने तयार केलेली ही सूची आहे. सदस्या प्राची सोमण यांनी पाहूण्यांची ओळख करून दिली.तसेच सल्लागार पत्रकार प्रकाश बाळ जोशी आणि कुमार कदम यांनी मार्गदर्शन केले.त्यानंतर उद्योगपती शंतनु भडकमकर यांनी लघुउद्योजकांच्या सुचीचे लोकार्पण केले आणि मार्गदर्शक मिहीर भडकमकर यांनी सुची संकेतस्थळावर प्रदर्शित केली.उद्योगपती शंतनु भडकमकर यांनी संस्थेला मार्गदर्शन केले.महत्वाचे म्हणजे, सौ. ज्योती देशपांडे यांनी उत्तमरीत्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.