जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांचे विशेष प्रयत्न
सिटी बेल लाइव्ह । रसायनी ।
पनवेल तालुक्यातील माडभूवन या आदिवासी ठाकुरवाडीला सारसई या गावाला जोडणारा रस्ता नाही.
या वाडीतील सर्व दैनंदिन व्यवहार सारसई – आपटा या गावांसी जोडणारे आहेत.
रोजगार,हाॕस्पिटल,शिक्षण,दैनंदिन व्यवहारासाठी या वाडीतील ग्रामस्थांना वर्षानूवर्ष दोन किलोमीटरचे डोंगर चड-उतार करावे लागते.जंगलातील या पायवाटेने ये-जा करताना रात्री – अपरात्री अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते.गरोदर माता,वृध्द माणसे , शाळेतील मुले ,आजारी रुग्ण या सगळ्याना याच खडतर पाय वाटेने प्रवास करावे लागते.या पायवाटेचा रस्ता बनावा यासाठी येथील ग्रामस्थ गेली तीन वर्ष मागणी करतात. परंतु वन विभागाच्या अडचणी मुळे हा रस्ता आजपर्यंत करु शकले नाही.

वनविभागाची रितसर परवानगी घेऊनच रस्ता करायचा म्हणून जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांनी विविध शासकीय कागदपत्रांची जमवा – जमव सूरू केली.जि.प.च्या सर्वसाधारण सभेत त्यांनी ही समस्या मांडली संबंधित अधिकारी,वन अधिकारी,यांच्या बैठका घेतल्या. जिल्ह्याच्या पालक मंत्री यांना निवेदन दिले. तरी देखील वन विभागाच्या मंजुरीचा ३/२ चा प्रस्ताव परिपुर्ण झाला नाही.यासाठीच आज ‘धडक कृती कार्यक्रमाचे आयोजन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत सहाय्यक प्रकल्प अधिकारी खेडकर साहेब,वन परिक्षेत्र अधिकारी गायकवाड साहेब,पंचायत समिती सदस्या मनिषा मोरे,मंडळ आधिकारी,जोशी साहेब,दशरथ गायकर,ज्ञानेश्वर मोरे,थोरवे, लक्ष्मण बावदाने,सरपंच ,ग्रामसेवक,तळाठी,उप आभियंता कुलकर्णी साहेब, जाधव साहेब,ग्रामपंचायत सदस्य व माडभूवन येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येत्या १५ दिवसाच्या आत या रस्त्याच्या मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या दाखल्यांची जबाबदारी घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालन टिळक महाराष्ट्र विध्यापीठाचे विध्यार्थी समाज कार्यकर्ते रत्नाकर घरत यांनी केले.








Be First to Comment