Press "Enter" to skip to content

वृक्षांच्या कत्तल आणी वणवा मुळे दुर्मीळ पक्ष्यांचे अधिवास संपुष्टात

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

वृक्षांच्या बेसुमार तोडी मुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.त्याच बरोबर पक्षाचे निवास स्थान असलेले वृक्ष यांच्या वरती आपण घाव घालण्यास सुरुवात केली आहे.यामुळे पक्षांचे अधिनिवास नष्ट होत चालले आहे.पूर्वी जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्ष असायचे त्याच बरोबर पक्षांचे मंजुळ स्वर हि कानी पडत असत.मात्र मानवानी स्वताच्या गर्जा पूर्ण करण्यासाठी वृक्षांच्या मुळावर घाव घालण्यास सुरुवात केली आणी पक्षांचे मंजुळ स्वर कानी पडण्याचे बंद झाले आहे.

वृक्ष वाढण्यासाठी कित्तेक वर्ष लागत असतात.मात्र त्यांची कत्तल करण्यासाठी काही क्षण लागत आहेत.यामुळे वृक्षांवर अधिवास करणार्‍या घुबड, घार, गिधाडे, मोर, पोपट कावळा,चिमणी,पारवे,असे दुर्मिळ पशुपक्ष्यांचे आश्रयस्थाने नष्ट होत चालली आहे. यामुळे त्याचा अधिवास जपणे ही काळाची गरज बनली आहे. ग्रामीण भागात डोंगरामध्ये, रस्त्याच्या बाजूला वड, चिंच, पिंपळाची, आब्यांची पुरातन वृक्ष असायचे परंतू डोंगर तसेच जंगलात वणवे पेटण्याचे प्रमाण वाढल्यामुळे त्याची झळ बसून अनेक वृक्ष जळून खाक होत असल्याचे दुर्देवी चित्र आपणास पाहायला मिळत आहे.
तर काही ठिकाणी झाडे सुकली आहे या नावाखाली वृक्षतोड करण्यात येत आहे. रस्त्याची रुंदी वाढवण्याच्या नावाखाली वृक्षांची तोड करण्यात येत आहे. यामुळे या झाडांच्या खोडांमध्ये राहाणार्‍या पक्ष्यांना आपले घर गमवावे लागत आहे.

पक्षाचे अधिवास नसल्याने त्या प्रजननावर परिणाम झाला आहे. यामुळे त्यांची उत्पत्ती कमी झाली आहे. नेहमी आढणारे पक्षी आज दुर्मीळ झाले आहेत. अशाच पद्धतीने वृक्षतोड सुरू राहिली तर दुर्मीळ पक्षी केवळ चित्रातच पाहायला मिळतील.

भारतीय संस्कृतीमध्ये घुबडाला महालक्ष्मीचे वाहन म्हटले आहे. मात्र, महालक्ष्मीचे वाहनच सध्या धोक्यात आले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली शुभ-अशुभाच्या चक्रव्यूहात हा पक्षी मोठ्या संकटात सापडले आहे.मात्र, निसर्गाचा र्‍हास सुरू झाला आहे.यामुळे सर्व स्थरांतून पक्षी वाचवण्यासाठी संकल्प करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.