Press "Enter" to skip to content

कॅस्ट्राल इंडिया लिमिटेड कारखान्यात भरघोस वेतनवाढ करार

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।

लाॅकडाऊनमुळे कारखानदारीत  मरगळ असताना देखील पाताळगंगा औद्योगिक वसाहती मधील कॅस्ट्राल इंडिया लिमिटेड कारखान्यात 18 हजार 70 रूपये वेतनवाढीचा करार संपन्न झाल्याने कामगार वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीमधील नामांकित असलेल्या कॅस्ट्राल कारखान्यात अंतर्गत युनियन आहे. कामगार वेतनवाढीसाठी वाटाघाटी सुरू होत्या.अंतर्गत युनियनचे अध्यक्ष सुरेश पाटील,कामगार प्रतिनिधी सुनिल म्हाञे, श्याम देशमुख,गुलाबराव येवले,सुनिल मुंडे,सुनिल जाधव आणि आनंद झिंगे यानी व्यवस्थापना बरोबर झालेल्या यशस्वी वाटाघाटी नंतर18हजार70रूपये वेतनवाढीचा करार मान्य केला.

कामगाराना कराराची माहिती देवून सहमती झाल्यानंतर कारखान्याच्या प्रवेशव्दारावर गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.व्यवस्थापनाच्या वतीने जनरल मॅनेजर विष्णू भागवत,एच आर मॅनेजर शशीधरण ,अधिकारी रूचिर मेहता उपस्थित होते.

कामगाराना अपेक्षित वाढ मिळवून दिल्याचे समाधान आहे.पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत अंतर्गत युनियनने केलेला हा सर्वाधिक वेतनवाढिचा करार असून संपूर्ण वाढ थेट पगारात मिळणार आहे.

सुरेश पाटील-युनियन अध्यक्ष

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.