रायपूर छत्तीसगड येथील फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित 32 वी जूनिअर वेस्ट झोन नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्राचे केले प्रतिनिधित्व
सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी रिस येथील घनश्याम म्हशीलकर यांचे सुपुत्र सचिन म्हशीलकर याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सुवर्ण व रौप्य पदक पटकावून रसायनी परिसराचे नावलौकीक केले आहे. रायपूर छत्तीसगड येथे फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने 32 वी जूनिअर वेस्ट झोन नॅशनल ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सचिन म्हशीलकरने मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत 200 मीटर मॅरेथॉनमध्ये रोप्य पद तर 400 मीटर मॅरेथाॅनमध्ये सुवर्ण पदक मिळवून सुयश प्राप्त केले.
दरम्यान नवी मुंबई येथील मॅरेथॉनचे राष्ट्रीय कोच रोहित कनोजिया यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन म्हशीलकरने सराव करून या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये बाजी मारून सुवर्ण व रौप्य पदक पटकाविण्याचा मान मिळवला आहे.
याअगोदरही सचिनने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत विविध पारीतोषिके पटकावली आहेत.त्याने मॅरेथॉन स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करुन मिळविलेल्या यशाबद्दल सचिन म्हशीलकरचे सर्वंत्र कौतुक होत आहे.
Be First to Comment