Press "Enter" to skip to content

श्रीवर्धन तलाठी संघाचे तहसीलदारांना निवेदन

पंतप्रधान किसान सन्मान योजनेची कामे कृषी खात्याकडे द्या…. श्रीवर्धन तहसील संघटनेची मागणी

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । अमूलकुमार जैन ।

संपूर्ण राज्यभर राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान किसान योजनेची कामे महसूल विभागाने अतिशय निष्ठेने व समर्पक भावनेने पूर्ण केलेले आहेत मात्र यापुढील पंतप्रधान किसान सन्मान योजनेची कामे महसूल विभाग सविनय पणे नाकारत असून सदरचे काम कृषी खात्याकडे वर्ग केले जावे किंबहुना त्यांच्याकडून ते करून घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन श्रीवर्धन तलाठी संघाने तहसीलदार सचिन गोसावी यांच्याकडे सादर केले आहे.

महाराष्ट्र तलाठी संघाने पुणे येथे झालेल्या बैठकीत पंतप्रधान किसान योजनेचे सर्व कामे महसूल कडे वर्ग करावे यासंदर्भात ठोस भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्र तलाठी संघाशी श्रीवर्धन तलाठी संघ संलग्न आहे. पुणे येथील राज्य पातळीवरती घेण्यात आलेला निर्णय व त्या निर्णयाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या भूमिकेसाठी श्रीवर्धन तलाठी संघ कटिबद्ध आहे असे श्रीवर्धन तलाठी संघाच्या वतीने सांगण्यात आले .

तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर करताना मंडळाधिकारी कल्याणराव देऊळगाकर , तलाठी अर्जुन भगत, सुदर्शन पालवे, श्रीवर्धन तलाठी संघाचे अध्यक्ष नितीन इंगोले व इतर सभासद हजर होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.