Press "Enter" to skip to content

शेतात तयार झालेले राब लागवडीस तयार, लागवडीस प्रारंभ

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

कालव्याचे तसेच धरणांचे पाणी शेतीला मिळताच तालुक्यातील शेतक-यांनी भाताची पेरणी केली असून,पेरलेल्या धान्याला उत्तम असे रोप आल्याने शेतकरी आनंदित झाले आहे.त्यामुळे एक आठवड्यात मध्ये लागवडीस सुरुवात केली जाईल त्याच बरोबर काही शेतकरी लागवड करण्याच्या तयारीत असल्याचे पहावयास मिळत आहे.असे तिथे जमलेल्या शेतक-यांनी सांगितले.

तालुक्यामध्ये कालव्याला तसेच धरणाचे पाणी दर वर्षी शेतीला मिळत असल्याने,येथील शेतकरी वर्षातून दोनवेळा पिके घेत आहे. यामुळे या पाण्यावर शेती करण्यासाठी शेतकरी भर देत आहे.पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या प्रकोप झाल्यामुळे अनेक वेळा शेतक- यांचे शेतीचे नुकसान सहन करावे लागत असते.सुरुवातीला पाणी न पडणे ,किंवा शेवटच्या क्षणाला जास्त पाउस पडल्याने अनेक शेतक-यांचे नुकसान होत असते. उन्हाळी शेती ही कालव्याच्या पाण्याने करीत असल्याने नुकसान होण्याचा धोका संभवत नाही,तसेच पावसाळ्यात झालेल्या शेतीचे नुकसान उन्हाळी लावलेल्या शेतजमिनीतून भरून निघत असते. पावसाला संपताच काही शेतकरी कालव्याच्या तसेच धरणाच्या पाण्यावर शेती करण्यास पसंद करतात.निसर्गाच्या पाण्याचा भरवसा नसतो.पावसाच्या पाण्याची पातळी वाढल्याने शेतीचे नुकसान होत असते.

यामुळे धरणांचे, कालव्याचे पाणी शेतीला मिळताच,तालुक्यामध्ये या पाण्यावर शेती करण्यास शेतकरी भर देत आहे. शेतक-यांनी भाताची पेरणी केली असून,पेरलेल्या धान्याला उत्तम असे रोप आले आहे.त्यामुळे एक दोन आठवड्यात मध्ये लागवडीस सुरुवात केली जाईल असे aमत तिथे जमलेल्या शेतक-यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.