सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
सम्यक सामाजिक संस्था रिस यांच्यावतीने रिस येथील संस्थेच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महारांजांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून वातावरण सुगंधित करण्यात आले.यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर उपस्थितांनी माहिती दिली.
तदनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाशशेठ गायकवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा प्रगड जातीच्या समाजाला एकत्रित करण्याचे काम केले.ते रयतेचे जगातील महत्वाच्या राजेंपैकी एक राजे होते. जगाला आदर्श देणारे शिवरायांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. लोकप्रिय, न्यायप्रिय असे जाणते राजे म्हणून सबंध विश्वात शिवरायांचे व्यक्तिमत्व असून त्यांचे विचार व कार्य आजही समाजाला, देशाला विश्वाला प्ररेणादायी आहेत असे प्रतिपादन प्रकाशशेठ गायकवाड यांनी बोलताना उपस्थित मान्यवरांना केले.
तर संतोष खिल्लारे यांनी बोलताना सांगितले कि दोनच राजे हीते जन्मले एक रायगडावर व दुसरे चवदार तळ्यावर तर सर्वांनी शिवरायांच्या व बाबासाहेब यांच्या विचाराचे , कार्याचे अनुकरण करावे.शिवरायांचे व बाबासाहेबांचे गुण आत्मसात करावे असे मत व्यक्त केले. इतर मान्यवरांनी शिवरायांचा जीवनपट, जीवनचरित्र उपस्थितांना उलगडून सांगितला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड होते.यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड ,अजित कडलक, सुनिल निकाडे,दाजीबा तायडे,दत्ता कांबळे,संतोष खिल्लारे, मुरलीधर साळवे,विजय बनसोडे,गौतम सरवदे, स्वप्निल वानखेडे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल निकाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दत्ताजी कांबळे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.








Be First to Comment