Press "Enter" to skip to content

अवकाळी पावसामुळे वीट व्यवसाय संकटात

अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत गावे अंधारात,शेतकरी चिंताग्रस्त

सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।

वातावरण बदलाचा फटाका मोठ्याप्रमाणावर बसला असून या मध्ये विट व्यवसाय पासून ते पाळेभाज्या लागवड करीत असलेल्या शेतकरी यांना सुद्धा यांचा फटका बसला सायंकाळी ७ वाजता अवकाळी पावसाने सुरुवात केल्यामुळे तबल दिड ते दोन तास पावसांचे तांडव समवेत सोसाट्याचा वारा सुरुच होते.त्याच बरोबर विट व्यवसाय करणारे व्यवसायीक मोठ्या संकटात सापडले आहे जानेवारी महिन्यात ७ तारखेला असाच अवकाळी पाऊस पडला त्यानंतर तबल दिड महिन्यानी पुन्हा आपले रुद्र रुप प्रगट केल्यामुळे अनेकांची मोठी तारांबळ उडाली.

अवकाळी पावसाने जोरदार सुरूवात केल्याने सर्वत्र गारावा निर्माण झाला असला तरी वीटभट्टी मालकांची आपल्या कच्च्या वीटा वाचवण्याकरीता तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले, परंतु पावसाचा जोर इतका भयानक होता की वीट भट्टी चालकांचे प्रयत्न सपशेल अयशस्वी ठरल्याने वीट भट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाल्याने वीट भट्टी व्यवसाय संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर अजूनही पाऊस बरसेल काय यांची शास्वती नाही.यामुळे वीटभट्टी मालकांचे अधिक मोठे नुकसान होणार या भीतीपोटी कच्च्या वीटा वाचविण्यासाठी वीटभट्टी मालकांची धावपळ उडत आहे.

अवकाळी पावासाने सर्वत्र ठिकाणी दाणादाण उडवून दिली त्याच बरोबर अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक गावे अंधारात गेली.त्याचबरोबर शेतकरी वर्ग मोठा चिंताग्रस्त झाले आहे.या अवकाळी पावसासमवेत सोसायट्याचा वारा विज या समवेत त्यांनी मोठी हजेरी लावली जवळ – जवळ दिड तास पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्यामुळे सर्वत्र ठिकाणी पाणी – पाणी निर्माण झाले होते.त्याच बरोबर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरु असल्यामुळे वहान चिखलात अडकल्याचे पहावया मिळाले एकांदरीत अवकाळी पावसामुळे मोठी हानी झाल्यामुळे व्यवसायीक चिंताग्रस्त झाले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.