Press "Enter" to skip to content

उल्हास नदी प्रदूषण : प्रशासनाला जागे करण्यासाठी लाक्षणिक उपोषण

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।

उल्हास नदीच्या पात्रता एक वेगळ्या प्रकारची वनस्पती आपले अस्तित्व विस्तार पाहत आहे. कर्जत शहर नदीच्या काठवर वेसले आहे. 15 – 16 ठिकाणी कुठलीही प्रक्रिया न करता थेट सांड़पाणी़ सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. हे सारे प्रशासन दररोज पाहात आहे मात्र त्यावर कोणतीही उपाय योजना करण्यात येत नाही. अशा निष्क्रिय प्रशासनाला जाग करण्यासाठी उल्हास नदी निर्मल जल अभियानच्या कार्यकर्त्यांनी एक दिवसाचे लक्षणीय उपोषण सुरू केले आहे.

छ्त्रपती शिवाजी महाराज व उल्हास नदी यांचा संबंध इतिहासात बऱ्याचदा मांडला आहे. मराठा आरमारासह अखंड भारताची जहाज निर्मिती उल्हास नदीवर झाली. ऐतहासिकदृष्ट्या महत्वाची असणारी व महाराज्यांच्या जिव्हाळ्याची उल्हास नदी सांडपाणी व रसायनांमुळे उगम ते संगम प्रदूषित झाली आहे. दोन वर्षांपासून उल्हास नदी निर्मल जल अभियानच्या कार्यकर्त्यांनी नदी स्वच्छता अभियान सुरू केले. दोन वर्षात नदीतील 99 टक्के जलपर्णी दिसेनाशी झाली. कर्जत मेडिकल असोसएशन, ज्येष्ठ नागरिक संस्था, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व इतर नागरिक मिळून नदी किनारी वृक्षारोपणाची मोहीम हाती घेतली आणि अभियानाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षसंवर्धन केले. नदीच्या उगमा पासून ते कोंढाणे पर्यंत पाहाणी केल्या नंतर सांडपाणी व रसायन नदीत थेट येत असल्यामुळे नदी प्रदूषित होत असल्याचे लक्षात आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे फुलीच्या घाटावर ( राधाकृष्ण घाट ) नदीच्या पात्रात एक वेगळ्या प्रकारची वनस्पती आपले अस्तित्व विस्तारू पाहात आहे.

नदीचे प्रदूषण थांबविण्यासाठी व निष्क्रिय प्रशासनाला जागे करण्यासाठी उल्हास नदी निर्मल जल अभियानचे कार्यकर्ते समीर सोहनी, मुकुंद भागवत, लता कुळकर्णी, विशाल सुर्वे, समीर विद्वांस व मिलिंद खंडागळे यांनी जुन्या नगरपालिका इमारती शेजारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू केले. त्यांना अनेक संस्थांनी व नागरिकांनी भेटून पाठिंबा दिला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.