Press "Enter" to skip to content

उरणमध्ये विनामास्क वाल्यांवर कारवाईचा बडगा

प्रत्येकी दंड ५०० प्रमाणे पहिल्या तासाभरात चार ठिकाणाहून २५ जणांवर कारवाई

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू / अजय शिवकर ।

“करोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्‍यता असून; बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क लावून फिरावे असे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाईचे आदेश काढले आहेत.

राज्यात पुन्हा कोरोना संक्रमीत रुग्णांची वाढ होत आहे. तरी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या अवतीभवती असलेल्या कित्येक चांगल्या व जीवास जीव देणाऱ्या व्यक्तींना ह्या दुष्ट कोरोनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्यातुन हिरावुन नेले आहे.‌

त्यामुळे आपण सर्वांनीच पुर्वी पेक्षा अधिक काळजी घेऊनच सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे, घरातुन बाहेर पडताना मास्क लावणे, बाहेरुन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवा. मला काहीच होणार नाही, मी तंदुरुस्त आहे, माझी रोग प्रतिकार शक्ती खुपचं स्ट्राँग आहे. अशा भ्रमात कृपया राहु नका. आपल्या स्वतःसाठी नाही निदान आपल्या कुटुंबासाठी तरी आपली काळजी घ्यावी.

उरणमध्ये आज कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगरपालिका व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्या कडून ५०० रुपये दंड वसूल केला जात आहे. शहरातील सर्व नाक्यावर कारवाई करण्यात येत आहे. तरी जनतेने आपल्यासह आपल्या कुटुंबाची, नातेवाईक व मित्रपरिवाराची काळजी घेत शासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आपली सुरक्षितेच्या दृष्टीने करावे असे आवाहन शासनातर्फे करण्यात येत आहे. त्या आदेशाचे पालन करणे आता गरजेचे बनले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.