कुटुंबाचा चरितार्थ सुरु ठेवण्यासाठी शेकडो अंतरावरून आणले पाणी, शेतीच्या विकासात मोलाचे योगदान
सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
पावसाळ्यात ओढ्याला खुप पाणी येत असते,या पाण्याचा योग्य वापर करून पाणी आडवा आणी पाणी जिरवा याच उद्देशाने,पाण्यावर बंधारा बांधून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा साठा करून,हेच पाणी शेकडो मैल अंतरावरुन शेती पर्यंत पोहचवून शेतामध्ये नंदनवन फुलविणारे वयाळ येथिल तरूण शेतकरी अतिष म्हात्रे शेतक-यांसाठी आदर्श ठरत आहे.
तालुक्यात उन्हाळी कालव्याचे पाणी येत असते.तर आही ठिकाणी हे पाणी शेतीपर्यंत पोहचत नसल्याने नदि अथवा पावसाळ्यात जमा झालेल्या पाण्याचा योग्य वापर करुन तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये विविध पिके घेत आहे.आजचे तरुण शेतकरी वर्ग औद्योगिक कारखान्याकडे वळले आहे.यामुळे अनेक ठिकाणी जमीन ओसाड पडत असल्यांचे दृश्य तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.निसर्गाच्या लहरी वातावरणाचा भरवसा नसतो. वातावरणात सातत्याने बदल होत असतात.तर कधी हवामानामध्ये फेरबदल होत असतात.यामुळे मळा पिकविण्यासाठी किवा भात लागवडी साठी माती मध्ये टाकलेले पैसा मिळत नाही शिवाय अंग मेहनत हि वाया जात असते .त्यातच या भाजीपाल्यावर किड्याचा प्रादुर्भाव पडत असतो.यामुळे दरवर्षी आम्ही शेतकरी संकटात सापडत आहे.
या वर्षी अचानक वातावरणात फेरबदल झाल्याने शेतामध्ये लावलेल्या भाजीपाल्याचे उत्पन्न थोड्या प्रमाणावर घट झाले असून,त्यातच भाजीपाल्यावर किड्याचा पादुर्भाव शिवाय कारखान्यामुळे जल प्रदूषणामुळे शेतकरी वर्ग मोठा चिंतेत ग्रस्त झाले आहे.यामुळे शेतकरी दर वर्षी अर्थिक संकटात सापडले चालले आहे.शिवाय शेतामध्ये भाजी पाल्याचे बियाणे लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी पिक येण्यास सुरुवात होत असते.वांगी ,तांबाटी,भेंडी,दुधी ,या सर्वांचे उत्पन्न घेत असतो असे असे वयाळ येथिल शेतकरी अतिष म्हात्रे यांनी प्रतिनिधीशी बोलतात सांगितले.








Be First to Comment