सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ.पारनेरकर विद्यालयातील दहावी २००३-०४ वर्गांमध्ये शिकणारे विद्यार्थी एकत्र आले आणि आपला गेट टूगेदर साजरा केला .त्याप्रसंगी त्यांना मार्गदर्शन करणारे गुरुजनवर्ग जोशी सर व कोळी सर उपस्थित होते.दोन्ही सरांनी आम्हा विध्यार्थी वर्गाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. आज त्यांनी घडवलेले विद्यार्थ्यांत कोणी इंजिनिअर, प्रोफेसर ,मेडिकल तसेच गावंच राजकरण करणारे सरपंच झाले आहेत.
कार्यक्रमप्रसंगी सरांनी घडवलेला विध्यार्थी विकास देवघरे (सरपंच-इसांबे) यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की “सर, तुम्ही जे विध्यार्थी घडवले आहेत ते आज समाजात स्वतःच्या नावाची ओळख करीत आहेत”
उपस्थित मित्र वर्ग- अमित खिस्मतराव, जितेंन पाटील,अतुल मालकर,हरेश जाधव,राजेंद्र खंडागळे,कैलास देवघरे,स्वप्नील ठोबरे,विकास देवघरे,आकाश म्हात्रे तसेच नीता पाटील,उर्मिला मोरे,निकिता पवार,विद्या देवघरे,जयश्री पवार आदी उपस्थित होते.सतरा वर्षांनंतर एकत्र आल्याने मित्रांनी एकमेकांशी चर्चा करुन मनमोकळ्या गप्पा मारल्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल मालकर यांनी केले आणि मित्रपरीवाराचे आभार मानले.








Be First to Comment