Press "Enter" to skip to content

उरणच्या विकासात वीर वाजेकर यांचे महत्वाचे योगदान : महादेव बंडा

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे ।

उरणच्या विकासात उरण मधील चळवळीतले कार्यकर्ते तथा समाजसेवक वीर वाजेकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे कार्य व विचारांचे जतन प्रत्येकाने केले पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या विचारांनुसार चालणे आजच्या काळाची गरज आहे असे मत उरण महल सहकारी मजदूर संघांचे चेअरमन महादेव बंडा यांनी व्यक्त केले.

उरण तालुका जडण घडणी मध्ये सिंहाचा वाटा असलेले , उरणच्या इतिहासातील एक महत्वाचे कामगार नेते, समाजसेवी व्यक्तिमत्व, मिठागर कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते स्वर्गीय वीर वाजेकर यांची 40 व्या पुण्यतिथीचे आयोजन मिठागर कामगार संघ कार्यालय कोटनाका उरण शहर येथे उरण पेठा मिठागर कामगार संघ, उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी संस्था, उरण महल सहकारी मजदूर संघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वीर वाजेकर यांच्या कार्याची माहिती, वाजेकर यांनी जीवनात केलेला संघर्ष, उरणच्या विकासात वीर वाजेकर यांचे योगदानाबद्दल महादेव बंडा यांनी उपस्थितांना माहिती दिली.

पुण्यतिथी निमित्त स्वर्गीय वीर वाजेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोटनाका येथे वीर वाजेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात उरण पेठा मिठागार कामगार संघाचे अध्यक्ष -बाळकृष्ण पाटील, उरण पेठा मीठ उत्पादक सहकारी संस्थेचे चेअरमन -दत्तात्रेय पाटील, जेष्ठ नागरिक संघटना पागोटेचे अध्यक्ष -मनोहर पाटील, फुंडे हायस्कूलचे चेअरमन -कृष्णाजी कडू, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामनाथ गायकवाड, उरण तालुका खादी ग्रामोद्योग सहकारी संघांचे चेअरमन-मुकुंद पाटील, जासई सहकारी भातगिरणीचे माजी मॅनेजर -नारायण सुतार, माजी सेक्रेटरी – आर जे ठाकूर,सेक्रेटरी-किशोर घरत,शेकाप सह चिटणीस-यशवंत ठाकूर, जयवंत तांडेल, सुहास घरत -जेष्ठ नागरिक,संचालक -उद्धव नामदेव घरत, नरेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. जेष्ठ मान्यवर, चेअरमन, संचालक,सभासद
कामगार,नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न झाला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.