Press "Enter" to skip to content

रक्तदान ही काळाची गरज : स्नेहा पाटील

मुरुड येथे पद्मश्री डॉ. तात्याराव लहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजिविनी आरोग्य सेवा संस्थेतर्फे रक्तदान शिबिर

सिटी बेल लाइव्ह । मुरूड ।अमूलकुमार जैन ।

रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे.एकाने रक्तदान केल्यास त्यातून चौघांना जीवनदान मिळते. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्‍तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्‍तीत जास्‍त लोकांमध्‍ये जनजागृती करुन रक्‍तदान वाढवणे ही आजच्‍या काळाची गरज आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे असे मत मुरुड नगरीच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी मुरुड येथे पदंश्री डॉ. तात्याराव लहाणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजिविनी आरोग्य सेवा संस्था आयोजित रक्तदान शिबिरात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर कोकण युनिक फाउंडेशन अध्यक्ष डॉ. जमीर कादरी, उद्योगपती दिलावर महाडकर, नगरपरिषद विरोधी नेते मंगेश दांडेकर, मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.विक्रमजित पडोळे,डॉ. मकबूल कोकाटे,जमीर करदमे, संस्थेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे,उपाध्यक्ष चंद्रकांत अपराध,कोषाध्यक्ष कीर्ती शहा आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.