Press "Enter" to skip to content

एस टी सुरू करण्यासाठी सरपंच गोपीनाथ जाधव यांचा पुढाकार

पातालगंगा परीसरासाठी एसटी बससेवा पुर्ववत सुरू करण्यासाठी परिसरातील ग्रामपंचायती सरसावल्या

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

कोरोनाच्या काळात गेले अनेक महिने बस सेवा बंद राहिल्या होत्या मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळुहळु कमी होत असतांना शिवाय आता शाळा तसेच कारखाने सुरु झाल्याने ये-जा करताना विद्यार्थ्यांचे आणि कामगारवर्गांचे नुकसान होत आहे. खोपोली- वाशिवली,वाशिवली – पनवेल- खोपोली लोहप मार्गी कर्जत एस टी बस सुरु करण्यासाठी सहकार्य करावे या दृष्टीकोणातून ग्रूप ग्राम पंचायत सावरोली,कुंभिवली,माडप,माजगांव,इसांबे,वडगांव अदि ग्रामपंचायत च्या सरपंच तसेच ग्रामसेवक सदस्य यांनी एक ठराव घेवून आपण एस टी बस सुरु करण्यासाठी निवेदन देण्यासाठी ग्रूप ग्राम पंचायत सरपंच गोपीनाथ जाधव,यांचा सातत्याने पुढाकार घेत असल्यामुळे सर्व स्तरातून अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

तसेच विलास कांबळे,सामाजिक कार्यकर्ते जयवंत पाटील,तुकाराम जाधव,तंटा मुक्ती अध्यक्ष अरुण जाधव,आदि या सर्वांच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले.

सावरोली ते वाशिवली या विभागात ६
ग्रामपंचायत येत असून या ३५ ते ४० वाड्या तसेच अनेक गावे जोडली गेली आहेत.मात्र एस टी बस सेवा सुरु होत नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.यामुळे राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील आणि खालापूर पंचायत समिती उपसभापती विश्वनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य सरपंच ग्रामसेवक यांनी एक बैठक घेवून आणि प्रत्येक ग्रामपंचायतींनी पत्र तयार करून माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव यांच्या पुढाकारातून हे निवेदन पनवेल तसेच कर्जत आगारा येथे देण्यात आले.

त्यांच्या या निर्णयामुळे एस टी बस सेवा सुरु होत असल्यामुळे कामगार तसेच शाळेय विद्यार्थी यांच्या मध्ये चैतन्यांचे वातावरण निर्माण होत आहे या ग्रामपंचायतीला अनेक गावे जोडले गेले आहे.यामुळे या गावामधून दुसऱ्या तालुक्यात किंवा गावामध्ये कामाला तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खुप असल्यामुळे तातडीने या एस टी बस सेवा सुरु करावी.त्याचबरोबर खाजगी वहानांचे दर पेट्रोल,डिजेल वाढल्याने सातत्याने वाढत असल्यामुळे शिवाय वयोवृद्ध यांना एस टी मध्ये सवलत असल्यामुळे हा प्रवास खुप सोयीस्कर होत असतो.या सर्व बाबीचा विचार करुन हे निवेदन देण्यात आल्याचे समजते.

आम्ही सहा ग्रामपंचायत मिटिंग घेवून बस सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी नेते सुरेश पाटील प.स.खा.उप सभापती विश्वनाथ पाटील यांचे सहकार्यातून मी आणी माझे सहकार्य कर्जत ,पनवेल आगार येथे सर्व ग्रामपंचायतीचे बस सुरु करण्याचे निवेदन देण्यात आले

माजगांव ग्रा.प. सरपंच गोपीनाथ जाधव

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.