Press "Enter" to skip to content

ग्रामपंचायत निवडणुकीसह सरपंच,उपसरपंचही बिनविरोध

खानावले ग्रामपंचायतीवर भगवा, सरपंचपदी जयश्री नाईंक तर उपसरपंचपदी मोहन लबडे

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

खानावळे ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध झाली असून सरपंचपदी जयश्री सुभाष नाईक आणि उपसरपंचपदी मोहन बालाराम लबडे बिनविरोध निवडून आले आहेत.

याअगोदर खानावले ग्रामपंचायत ही विरोधी पक्षाकडे होती.परंतु मोहन बालाराम लबडे यांनी माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश करताच त्यांच्या पायगुणाने संपुर्ण जिल्हा परिषद विभाग भगवामय झाला.यानंतर माजी उपसभापती देविदास पाटील, जेष्ठ शिवसैनिक काशिनाथ ठाकूर, नवनिर्वाचित उपसरपंच मोहन लबडे यांच्या प्रयत्नाने खानावले ग्रामपंचायतीत नऊपैकी सात सदस्य शिवसेनेचे बिनविरोध निवडून आले.तर सरपंच व उपसरपंच यांच्या निवडणूकीमध्येही सरपंचपदी जयश्री सुभाष नाईक व उपसरपंच पदासाठी मोहन बालाराम लबडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बिनविरोध निवडून आल्याचे जाहिर केल्यावर कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

फटाक्यांची आतशबाजी करुन खानावले,भोकरपाडा व इतर ग्रामपंचायत हद्दीतील गावांतून भव्य मिरवणूक बॅन्ड व तुतारीच्या तालावर काढण्यात आली.या मिरवणूकीत गुलालाची उधळण करीत तरुणाई नाचात मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेली माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, सुधीर पाटील,परेश पाटील, पंचायत समिती विभागप्रमुख नितिन पाटील, उपविभाग प्रमुख किशोर पाटील,चौक विभागप्रमुख सुधीर ठोंबरे,वासांबे रसायनी विभागप्रमुख अजित सावंत,रामदास पाटिल यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले.यावेली श्री गुरुकृपा परपुज्य रत्नाकरबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश रत्नाकर गुरुजी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सरपंचपदी जयश्री नाईंक व उपसरपंचपदी मोहन बालाराम लबडे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.