Press "Enter" to skip to content

हनुमान कोळीवाडा पूनर्वसनाचे आश्वासन

केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मंडावीया यांनी दिले राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत आश्वासन

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।

जेएनपीटीच्या माध्यमातून हनुमान कोळीवाड्याचे पुनर्वसन १७ हेक्टरमध्ये करण्याचे पुन्हा एकदा आश्वासन केंद्रीय नौकानयनमंत्री मनसुख मंडावीया यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत दिले.

हनुमान कोळीवाडा पुनर्वसन करणे संदर्भात दिल्ली येथील खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजीत केली होती. सदर बैठकीस मंत्री मनसुख मंडावीया यांचे समवेत जवाहरलाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी, खासदार सुनिल तटकरे, हनुमान कोळीवाडा सरपंच परमानंद कोळी, राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील,उरण विधानसभा अध्यक्ष सौ.भावना घाणेकर, नवी मुंबई राष्ट्रवादी काॅग्रेसचे कार्याध्यक्ष जी एस पाटील, रमेश कोळी, हरेश कोळी, नितीन कोळी, नरेश कोळी इ. उपस्थित होते.

जवाहरलाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय सेठी यांनी यावेळी सांगीतले की ६ हेक्टर जागा आम्ही देवू व १० हेक्टर जागा कलेक्टर देणार. यावर खासदार सुनील तटकरे यांनी सांगीतले की महाराष्ट्र पूनर्वसन कायदा नुसार हनुमान कोळीवाडा पूनर्वसन हे १७ हेक्टर्समध्ये करायचे आहे. यावर खासदार शरद पवार यांनी मंत्री मनसुख मंडावीया यांना सांगीतले की जमीन संपादन करताना तेथील नागरीकांचे पूनर्वसन करणे गरजेचे आहे व तसा कायदा आहे. यावर मंत्री महोदयांनी हनुमान कोळीवाडा पुनर्वसन करण्यास मान्यता दिली.

मंत्री महोदयांच्या आश्वासनाने लवकर पूनर्वसन होण्याची खात्री झाली असून तशा प्रकारचे आदेश जिल्हाधीकारी यांना रायगड पालक मंत्री यांच्या माध्यमातून सूचना देण्यात येतील असे खा.सुनिल तटकरे यांनी सांगीतले.

हनुमान कोळीवाडा गावचे पुनर्वसन होऊन ३० ते ३५ वर्षे उलटून गेली आहेत. या दरम्यान अनेकवेळा पुनर्वसनाचे आश्वासन मिळाले आहे. त्यामुळे यावेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होईल ना ?, का फक्त पुन्हा एकदा आश्वासनच राहणार नाही ना? अशी चर्चा ग्रामस्थांत सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.