आता फी भरली नाही म्हणून शिक्षण थांबणार नाही
सिटी बेल लाइव्ह । नवी दिल्ली ।
कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यवसायाचे नुकसान झाले. अनेकांना आपले जॉब गमवावे लागले. अशामध्ये आपल्या मुलांना शाळेमध्ये घालणे आणि ऑनलाईन शिक्षण देणे देखील अनेक पालकांना जड गेले.
आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना, शाळा सुरू झाल्यानंतर शाळेकडून फी वसुलीचा एकच जोर पालकांवर सुरू आहे. राजस्थान मध्ये घडलेल्या अशाच एका प्रकारावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने खासगी शाळांचे कान टोचले!
कोणतीही खासगी शाळा फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकू शकणार नाही असे आदेशच सर्व शाळांना सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
असे केले असले तरी देखील, 5 मार्चपासून सर्व शाळा पूर्ण फी घेऊ शकतील. मात्र त्यासाठी पालकांना सहा महिन्याच्या हप्ते पाडून द्यावे लागणार आहेत, असे देखील शाळांना सूचित करण्यात आले आहे.
याउपर जरी पालक फी भरू शकले नाहीत तरीदेखील, खासगी शाळा विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवू शकतील. मात्र, विद्यार्थ्यांना शाळेतून काढू शकणार नाहीत असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये म्हणून, सर्वोच्च न्यायालयाने हा घेतलेला निर्णय स्तुत्य असल्याची चर्चा सर्व स्तरातून होत आहे.
संकलन : अजय शिवकर








Be First to Comment