सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार ।
महावितरण कंपनीने ३५ लाख वीज ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्टातील ४ कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच महावितरण कंपनीच्या निषेधार्थ महावितरण कंपनीच्या नागोठणे वीज बिल केंद्रावर टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असल्याचे निवेदन नागोठणे भाजपच्या वतीने नागोठणे कार्यालयाला देण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळामध्ये मध्यप्रदेश, गुजरात, केरळ या राज्यांनी वीज बिलात ५० टक्के सवलत दिली आहे त्याच प्रमाणे महाराष्ट्रात देखील महाविकास आघाडी सरकारने सवलत द्यावी अशी विनंती निवेदना मार्फत करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, माजी तालुकाध्यक्ष मनोज धात्रक, संतोष लाड, विठोबा माळी, नागोठणे विभाग अध्यक्ष ज्ञानदेव शिर्के,
नागोठणे महिला आघाडी अध्यक्षा श्रेया कुंटे,रोहा तालुका महिला आघाडी चिटणीस अपर्णा सुटे, नागोठणे शहर उपाध्यक्षा प्रियांका पिंपळे, भाजप जेष्ठ कार्यकर्ते मारुती शिर्के, राजेंद्र लवटे, तिरथराव पोलसानी, सुभाष पाटील, तसेच विभागातील भाजपा कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होते.








Be First to Comment