सिटी बेल लाइव्ह । उलवे । सुनिल ठाकुर ।
उलवे नोड सेक्टर 20 मधील जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र यांना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील यांनी सर्व जेष्ठ नागरिकांना व जि. प. शाळेतील शिक्षकांना शिर्डी दर्शन घडावे यासाठी धार्मिक सहली चे आयोजन केले होते.
उलवे ते टिटवाळा दर्शन ते शिर्डी नंतर शनिशिंगणापूर ते रांजणगाव नंतर आळंदि. प्रति शिर्डी असा प्रवास होणार आहे .या सहलीची जबाबदारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पाटील, राकेश करंगुटकर, लकी मथारू तसेंच जेष्ठ लोकांची देखभाल मढवी गुरुजी, कोळी गुरुजी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

या प्रवास दरम्यान प्रशांत पाटील (मा.सरपंच) यांनी सर्व जेष्ठनागरिक यांना स्वखर्चाने फळे वाटप केली. अशा या राजेंद्र पाटील यांच्या कार्याबद्द्दल उलवेवासीय त्यांना धन्यवाद देत आहेत.








Be First to Comment