सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर ।
उमरखेडच्या नायब तहसीलदारांवर वाळूमाफियांकडून झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना उद्या मंगळवार 2 फेब्रुवारीला सामूहिक रजेवर जाणार आहेत.
उमरखेड यवतमाळ येथील नायब तहसीलदार वैभव पवार शासकिय कर्तव्य बजावत असताना रेती माफियानी प्राणघातक हल्ला केला होता.या घटनेनंतर तीव्र संताप व्यक्त होत असून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेनी सामूहिक रजेवर जात निषेध नोंदविण्याचा निर्णय घेतला आहे.याबाबतीचे पञ जिल्हाधिकारी याना देण्यात आले असून एक दिवसाची नैमत्तिक रजा मंजूर करावी अशी विनंती संघटनेनी केली आहे.







Be First to Comment