सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील पाली भूतवली धरणाचे काम पूर्ण झाले आहे, कालव्याचे काम बाकी आहे त्यामुळे या परिसरातील शेतक-यांना उन्हाळी भातशेतीसाठी अद्याप पर्यत पाणी मिळत नाही, रखडलेल्या धरणावर आमदार महेंद्र थोरवे यांनी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

तालुक्यातील रेल्वे पट्यातील गावांना वरदान ठरणारे पाली भूतवली धरण पूर्ण आहे मात्र पाणी पुरवठा करणारे कालवे अद्याप पूर्ण नाहीत त्यामुळे धरण डोक्याशी शेतकरी, ग्रामस्थ उपाशी अशी परिस्थिती येथे झाली आहे.आमदार महेंद्र थोरवे यांनी पाली भुतीवली प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली व पुढील कामाचे नियोजन करण्यासाठी सबंधित विभागाला आदेश देण्यात आले.

यावेळी जलसंपदा विभाग अभियंता राजभोज, उपअभियंता रोकडे, शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, पंचायत समिति सदस्य अमर मिसाळ, उप तालुका प्रमुख दशरथ भगत, विभाग प्रमुख शरद ठाणगे, अविनाश भासे, असल ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment