Press "Enter" to skip to content

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या राहणीमान भत्यातील वाढीवर डल्ला; वरिष्ठांकडे तक्रार

सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

विंधणे ग्रामपंचायतीमधील कर्मचार्‍यांची 2019 सालापासून राहणीमान भत्यात झालेली वाढीवर कोणीतरी डल्ला मारला असल्यानेच ती मिळत नसल्याची संबंधित कर्मचार्‍यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे. तसेच याची प्रत उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी दिली आहे.

विंधणे ग्रामपंचायतीमधील कैलास कमळाकर भोईर, आत्माराम माया नवाली व अनिता राजाराम कोळी या कर्मचार्‍यांना कामगार आयुक्त यांच्याकडील पत्रानुसार 1-1-2019 ते दि. 30-6-2019 पर्यंत 3325 तसेच दि. 1-7-2019 ते दि. 31-12-2019 पर्यंत 4050 या प्रमाणे राहणीमान भत्यात वाढ झालेली आहे. परंतु वरील कर्मचार्‍यांना अद्यापपर्यंत 2800 प्रमाणेच राहणीमान भत्ता मिळत आहे. राहणीमान भत्यात वाढ करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे 23-9-2019 रोजी अर्ज केला आहे. परंतु आम्हाला अजून वाढ मिळालेली नाही.

सदर कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा तक्रार अर्ज विंधणे ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक यांच्याबरोबर गटविकास अधिकारी उरण पंचायत समिती यांच्याकडे केली असल्याचे पत्रावरून उघड होते.

याबाबत विचारणा करण्यासाठी संपर्कसाधण्यासाठी प्रयत्न केला असता. तो होऊ शकला नाही. तरी या पत्राची दखल घेऊन वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या राहणीमान भत्यातील वाढीवर डल्ला कोण मारतो याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.