Press "Enter" to skip to content

हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचे आंदोलन स्थगित


सिटी बेल लाइव्ह । उरण । घनःश्याम कडू ।

जेएनपीटी बंदराच्या उभारणीसाठी शेवा व हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. परंतु हनुमान कोळीवाडा गावाला वाळवीने पोखरले आहे. गेली 37 वर्षात पूर्वसनाच्या शोधात असूनही न्याय मिळत नसल्याने आज २१ जानेवारी रोजी भरसमुद्रात चॅनेलबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात होता. परंतु पुन्हा एकदा आश्वासन मिळाल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेली 37 वर्षातील शासन, जेएनपीटी, मंत्रालयात विनंती अर्ज समितीपुढे झालेल्या निर्णयाचा तपशील दिला आहे. आजपर्यंत अनेक मोर्चे, आंदोलन, निदर्शने, उपोषण झालेली असूनही आजही ग्रामस्थ उपाशी आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. परंतु आजतागायत जागेचा काही शोध लागेला नाही, यापुढेही लागेल असे वाटत नाही.

गेली अनेक वर्षे हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ नेहमीच आश्‍वासनावरच अवलंबून असूनही अनेक समस्यां आजही प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आज जेएनपीटी बंदरात येणार्‍या जहाजांचा मार्ग रोखण्यासाठी भरसमुद्रात चॅनेल बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र काल सायंकाळी झालेल्या चर्चेनंतर ग्रामस्थांनी तूर्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून जर न्याय मिळाला नाहीतर पुन्हा आंदोलन करणार असल्याची माहिती ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी यांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.