सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील खांब ग्रा.पंचायतीवर १९९५ पासून निर्विवादपणे राष्ट्रवादी कॉंग्रेसची असलेली सत्ता कायम राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश आले असून येथे त्यांनी आपला अभेद्य गड यावेळीही कायम राखला आहे.
रायगड जिल्ह्याचे खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, आ.अनिकेत तटकरे यांनी या ग्रा. पंचायतीच्या विकास कामांसाठी वेळोवळी दिलेले झुकते माप व भविष्यातील प्रलंबित असणारी विविध विकासकामे ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनच पुर्ण होऊ शकतात असा विश्वास येथील मतदारांचा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने इथला आपला विजय संपादित केला आहे. तर स्थानिक नेत्रुत्व व जेष्ठ नेते रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे यांचे लाभलेले विशेष नेतृत्व व त्यांना युवा नेते महेंद्र पोटफोडे यांचे लाभलेले विशेष सहकार्य यातून हा विजय साकार झाला असल्याचे विजयी उमेदवार मनोज शिर्के यांनी निवडणूक निकालाबाबत माहिती देताना पत्रकारांना सांगितले.
संपूर्ण तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे या ग्रा.पंचायतीच्या निकालावर विशेष लक्ष लागून राहिल्याने निकालाबाबत सर्वांनाच फार मोठी उत्सुकता लागून राहिली असतानाच अखेर निकालाच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळविल्याने
सा-यांचीच उत्सुकता थांबली.मतदान प्रक्रिया पुर्ण होण्यापूर्वीच या ग्रा.पंचायतीमध्ये प्रभाग क्र.२ मध्ये २ उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला हा शुभशकुन ठरला असतानाच प्रत्यक्ष निवडणूक निकालाच्या दिवशी प्रभाग क्र.२ मध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते मनोज शिर्के यांनी ५४३ मतांचे भरघोस मताधिक्य प्राप्त विरोधी उमेदवार दिलिप लाडगे यांचा दारूण पराभव केला. या लढतीत दिलीप लाडगे यांना केवल ७० मते पडून त्यांचे डिपाँझिट देखील जप्त झाले.तर प्रभाग क्र.१ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे योगेश धामणसे यांना ३३४ व मानसी चितळकर ३६० व मेघना खामकर यांना २१७ इतकी मते मिळाली. तर त्याच प्रभागामध्ये विरूद्ध गटाचे कल्पेश माने २३३,रंजना चितळकर ३४५ व दीपाली लाडगे यांना २१० इतकी मते मिळाली. तर प्रभाग क्र. ३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रेय वातेरे ३६०,सुचिता परबळकर ३८० व सुरेखा पार्ठे यांना ३९९ इतकी मते मिळाली. तर विरूद्ध गटाचे यशवंत घरट २०५,अनिता माने १८३ व स्वाती साळुंखे यांना १६१ मते मिळाली.
खांब ग्रा.पंचायतीच्या निवडणूक निकालाने पुन्हा एकदा येथे आपले वर्चस्व प्रस्थापित करून आपली ताकद दाखवून दिली आहे. या निवडणूक निकालासाठी खांब, नडवली, वैजंनाथ, घेरासूरगड, रेवेचीवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे तमाम कार्यकर्ते, महिला व तरूण कार्यकर्ते यांनी मोठेच योगदान दिले असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून आले.








Be First to Comment