Press "Enter" to skip to content

चौकमध्ये कावळे व तुपगावात कोंबड्या मेल्या : पोल्ट्रीधारक धास्तावले

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

चौक बाजारपेठमधील वडाच्या झाडावर बसणारे चार कावळे व तुपगाव येथील चार कोंबड्या यांचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चौक बाजारपेठमध्ये एक मोठे वडाचे झाड असून त्यावर अनेक कावळे रात्रंदिवस बसत असतात.आज सकाळी दोन कावळे झाडावरून पडून तडफडत मरण पावले,त्यामुळे परिसरात ही बातमी कळताच घबराट सुरू झाली आहे, त्यातच तुपगाव येथे तीन कोंबड्या मरून पडल्याची माहिती मिळाली.व लगेचच दोन कोंबडया तडफडत असताना आढळल्या,थोडया वेळाने त्याही मयत झाल्या.ही माहिती माजी सरपंच शरीफ भालदार यांनी त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी यांना कळविली.

याबाबत डॉ.चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता स्थलांतरित होणाऱ्या पक्षांच्यामुळे असे रोग येतात,एच1एन1 असे या रोगाचे नाव आहे.चिकन साठी तयार करणाऱ्या पक्षांचे नेहमी लसीकरण होते,त्यामुळे हा रोग सहसा होत नाहीत, कारण सहा आठवड्यात हे पक्षी विक्रीसाठी जातात,तर अंडी देणाऱ्या कोंबड्या ह्या साधारण वीस आठवडे एकाच ठिकाणी असतात.त्यामुळे तिथे रोग लवकर पसरतो असे सांगून कावळे पुणे येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठविले असून अहवाल आल्यावर निदान समजेल असे सांगितले.

चौकचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.मर्चंडे यांना ही माहिती मिळाल्यावर तेही तुपगाव येथील मयत कोंबड्या कशामुळे मेल्या हे बघण्यासाठी गेले.ही बर्डफ्लूची लक्षणे नसल्याचे सांगून विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसतात असे सांगितले. कोरोनाच्या भीतीने अगोदरच भीती निर्माण झाली आहे,त्यातच ही लक्षणे दिसल्यावर भीतीने लोक गारठले आहेत.मार्गशीर्ष महिना उद्या समाप्त होत आहे.खवय्ये चिकणवर ताव मारणार आणि ही भीती पसरल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत पडले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.