Press "Enter" to skip to content

‘पानिपत’_ एका वेगऴ्या नजरेतुन

‘पानिपत’_ एका वेगऴ्या नजरेतुन

अग्निर्ज्योतिरह: शुक्ल:षण्मासा उत्तरायणम् ।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना:।। (भगवद्गीता ८.२४)
अग्नी, ज्वाला,दिवस, शुक्लपक्ष, उत्तरायणाचे सहा महिने अशा काऴी मृत्यु पावलेले ब्रह्मवेत्ते ब्रह्मपदास जातात.

१४ जाने.१७६१ हिंदुस्थानच्या इतिहासातला एक महत्वाचा दिवस.पानिपतावर एक महाभयंकर युध्द अफगाणीस्थानचा अब्दाली व भाऊ साहेबांच्या नेतृत्वात मराठा सैन्यात लढले गेले.
या लढाईत लौकीक दृष्ट्या मराठ्यांचा पराभव झाला असला तरी तो मराठ्यांचा विजयच होता.कारण या नंतर एकाही परदेशी आक्रमकाने उत्तरेकडुन हिंदुस्थानावर स्वारी करण्याचे धारीष्ट्य दाखवले नाही.जेता अब्दाली सुध्दा दिल्लीच्या तख्ताचे स्वप्न सोडुन परत अफगाणीस्थानात परतला.

हिंदुस्थान हा पूर्वीपासुन कधी एकसंध नव्हताच #ब्रिटिशांमुऴे तो नाईलाजाने एकसंध झाला.त्या मुऴे हिंदुस्थानातली प्रत्येक राज्ये हि स्वतंत्रच हवी या #ब्रेकिंगइंडियाफोर्स व

कम्युनिस्टडावेपूरोगामी यांच्या रडगाण्याला खणखणीत उत्तर म्हणजे #पानिपताचेयुध्द हा कानाखाली काढलेला जाऴ आहे.

उत्तरेतल्यादिल्लीच्याबादशाहचे तख्त राखण्याकरता व हिंदुस्थानावर येणारा अफगाणी मुसलमानांचा वरवंटा रोखण्याकरता.महाराष्ट्रातल्या मराठा साम्राज्याचे पेशवे श्री सदाशीवराव भाऊंच्या नेतृत्वात शिंदे, होऴकर, बुंदेले अशा अनेक मातब्बर सरदारांच्या सैन्य सहकार्याने पराक्रम व बलीदानाने मराठा सैन्याने हिंदुस्थान अखंड ठेवला .या सर्वांनी प्राणत्याग करुन, तन मन धन समर्पण करुन #हिंदुस्थानअेकसंधहोताम्हणुनचयवनीआक्रमकांपासुनवाचवला_होता.

हा लेख लिहिताना एक प्रसंग आठवला
कै.सोमनाथ चँटर्जी (माजी लोकसभा अध्यक्ष) हे कट्टर डावे नेते होते त्यांनी एकदा एका कार्यक्रमात हिंदुस्थान हा कधीच एकसंध नव्हता असे विधान केले होते तेव्हा त्या ठिकाणी असणार्या कै.सुषमा स्वराज यांनी त्यांना रोकठोक प्रत्युत्तर देताना म्हटले “अगर हिंदुस्थान कभी एकसंध नही होता तो एक बंगालन अपने बेटे का नाम गुजराथ के सोमनाथ भगवानसे प्रभावीत होकर नही रखती “
डाव्यांचे हे विषारी प्रचार रोखताना हा प्रसंग सदैव समोर येतो
हतो वा प्राप्ससि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् । (भगवद्गीता)
युध्दात मृत्यु आल्यास स्वर्ग प्राप्त होईल किंवा युध्द जिंकलास तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होईल यात संशय नाही. #योगेश्वरकृष्णांनीअर्जुनासकेलेलाउपदेश मराठा सैन्याने #यमुनेच्या_काठावर तंतोतंत पाऴला.
ब्रह्मरंध्रातुन प्राणत्याग करणारे योगी व रणांगणावर धर्मयुध्द करणारे सैनिक या
दोघानांच सुलभपणे मोक्ष प्राप्त होतो हे शास्त्रवचन मराठ्यांनी प्राणपणाने जपले.
मकर संक्रमणाच्या उत्तरायण काऴात या सर्व पराक्रमी रणधुरंधरांनी देहत्याग केला.तो केवऴ हिंदुस्थान अखंड राहावा म्हणुनच
उत्तर दिशा हि मोक्षाची मानली गेली आहे.मराठ्यांनी आपल्या दैदिप्यमान पराक्रमाने यावर शिक्कामोर्तबच केले.
या सर्वांच्या चरणी नतमस्तक होवुन लेखन विराम घेतो.

भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ले
Vengurlabhushan@gmail.com

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.