सिटी बेल लाइव्ह । मुंबई । घनश्याम कडू ।
मुंबई येथे भारतीय फोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाची (BMS) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पाडली. या बैठकीत देशातील सर्व बंदरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत कामगार नेते सुरेश पाटील यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी एकमुखाने निवड करण्यात आली. देशातील सर्व उद्योगक्षेत्रातील एक नंबरची असलेली कामगार संघटना भारतात अत्यंत प्रभावीपणे कार्य करत आहे. या बैठकीत देशातील कामगारांच्या अनेक समस्या विषयी चर्चा करण्यात आली यामध्ये JNPT खाजगी करणाला विरोध करण्यात आला. कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आवाज उठवण्याचे काम सर्व बंदरात करण्यात आला.

या बैठकीला महासंघाचे(BMS) राष्ट्रीय अध्यक्ष अँड. भवानी शंकर, उपाध्यक्ष जगदीश राव,केंद्रीय नेते उद्योग प्रभारी अण्णाधुमाळ, महासंघाचे प्रभाकर उपरकर,व्यकंपा नाईक,JNPT चे माजी विश्वस्त रवी पाटील, कामगार नेते सुधीर घरत सर्व बंदरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








Be First to Comment