सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा ।
दिवसेंदिवस पाताळगंगा या नदिची अवस्था बिकट होत चालली असताना, मात्र या कडे सातत्यांने दुर्लक्ष करण्यात येत आसल्यामुळे नकळत आपल्या कारखाण्यातील पाणी नदिच्या पात्रात सोडुन देत असतात.याचाच फटका जलचर प्राणी यांना बसत असल्यामुळे माशांची वाढ कमी होत आहे.त्यांच बरोबर मासे मृत होत असल्यांचे स्थानिक मच्छिमारी करणारे नागरीक यांच्या कडून बोलले जात आहे.
विजेची निर्मिती झाल्यावर टाटा पावर हाउस चे पाणी या पाताळगंगा नदीला सोडले जाते.या सोडलेले पाणी गगनगिरी महाराज यांच्या मठाजवळ पाणी शुद्ध असते परंतू हे पाणी जसे गगनगिरी महाराज यांच्या मठातून बाहेर पडते त्याच्या थोडयाच अंतरावर औद्योगिक कारखाने वसले आहे.त्यामुळे खोपोली पासून ते आपटा पर्यंत या नदीची अवस्था एकदम बिकट होत चालली आहे.कधी -कधी या दुशिद्ध पाण्याचा फटका नदीच्या पाण्यामध्ये असणा-या जलचर प्राण्यांना बसत आहे.
पूर्वी या नदिमधून भरपूर मासे मिळत असे,शिवाय कुटुंबांचा उदार निर्वाह या माश्यांच्या विक्रीने होत होता.परंतू या नदीला केमिकॅल युक्त पाणी सोडत असल्याने या पाण्यापासून शरीराला खाज सुटणे,अंगावर फोडी येणे,यासारखे त्रास जाणवू लागत आहे.असे मत्स्य व्यवसाय करणा-यांनी व्यक्त केले.शिवाय नदीला मासे अल्प प्रमाणात मिळत असल्याने,आता घरचे सांभाळणे कठीण जात असल्यांचे मत मस्य व्यवसाय करणारे नागरीक यांनी व्यक्त केले.








Be First to Comment