पत्रकारांनी दाखविलेल्या चुकांमुळेच कामामध्ये बदल करता येतो – पोलिस अधिक्षक अशोक दुधे
सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । राकेश खराडे ।
पत्रकारदिनाचे औचित्य साधत पत्रकार उत्कर्ष समितीकडून अलिबाग येथे पत्रकारांसाठी आरोग्य शिबीर व परीसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे,जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, जेष्ठ पत्रकार आविष्कार देसाई, जेष्ठ पत्रकार जयंत धुळप, जेष्ठ पत्रकार सुधीर शर्मा ,कानसा वारणा फाउंडेशनचे संथापक दिपक पाटील , जेष्ठ पत्रकार तथा अॅडव्होकेट विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे.पोलिस ज्याप्रमाणे चौवीस तास मेहनत घेत असतात त्याप्रमाणे पत्रकारही तहानभूक हरवून चौवीस तास मेहनत घेत आहेत. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दिलेला वसा प्रामाणिकपणे आताच्या पिढीने पुढे न्यायला हवा असे जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.
तर जिल्हा माहिती व जनसंपर्क अधिकारी मनोज सानप यांनी सांगितले की, पत्रकारांनी नियमांचे पालन करुन आपली पत्रकारीता करावी.पत्रकार समाजाचा आरसा आहे.त्यांना न्याय देण्याचे,दिशा देण्याचे काम त्यांनी करावे.असे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकार उत्कर्ष समितीच्या कार्याचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार उत्कर्षं समितीचे उपाध्यक्ष राकेश खराडे यांच्यासह पदाधिकारी, सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विश्वनाथ गायकवाड यांनी पाहिले तर आभारप्रदर्शन वैभव पाटील यांनी केले.








Be First to Comment